सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात तीन लाख ६१ हजार साखर पोत्यांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:06+5:302020-12-30T04:32:06+5:30
बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कार्यस्थळावर श्री दत्त मंदिर परसिर सुशोभिकरण उट्घाटनासह या हंगामात उत्पादित ...
बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कार्यस्थळावर श्री दत्त मंदिर परसिर सुशोभिकरण उट्घाटनासह या हंगामात उत्पादित ३ लाख ६१ हजार पोती पूजन, दोन कोटी १० लाख युनिट वीज निर्यात, टर्बाईन पूजन व एक कोटी ३३ हजार इथेनॉल करारापैकी सात लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा टॅंकर्सचे पूजन अशा संयुक्त कार्यक्रमासाठी अध्यक्ष नवीद मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नवीद मुश्रीफ म्हणाले, या हंगामाच्या ५८ दिवसांत तीन लाख, ४५ हजार टन ऊस गाळपानंतर तीन लाख ६१ हजार क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उतारा १०.४६ टक्के असून, बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीचा उतारा धरून एकूण सरासरी ११.९६ टक्के होतो. सध्या देशात वाढत चाललेल्या साखर उत्पादनाचा विचार करता, बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीचा निर्णय संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. या हंगामात ९०.४७ युनिट वीज निर्मिती प्रतिटन सरासरीने आजअखेर एकूण तीन कोटी १० लाख युनिट वीजनिर्मिती केली आहे. त्यापैकी दोन कोटी १० लाख युनिट वीज निर्यात केली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष मुश्रीफ यांनी केले. यावेळी जनरल मॅनेजर संजय शा. घाटगे, जे. डी. मुसळे, उपसभापती दीपक सोनार, सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते
फोटो
बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कार्यस्थळावर तीन लाख ६१ हजार साखर पोत्यांंचे पूजन करताना अध्यक्ष नवीद मुश्रीफ, यावेळी प्रमुख कार्यकर्ते व विभागप्रमुख उपस्थित होते.