वळवाचा तडाखा नुकसानदायी

By admin | Published: May 9, 2014 06:10 PM2014-05-09T18:10:52+5:302014-05-10T20:27:52+5:30

राधानगरी : एप्रिल - मेच्या उकाड्याने हैरान झाल्यावर एखादा वळीव पाऊस व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. जेणेकरून उष्णता कमी होऊन उन्हास सुस‘ होतो. यावर्षी वळीव पावसाने मात्र माणसांचे जगणे अस‘ केले आहे. गारपीट, वादळाचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसाचे वातावरण पाहता हा पाऊस वळवाचा की मृगाचा असा प्रश्न पडतो. जणू महिनाभर अगोदर मृग नक्षत्र सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.

Wreckage is damaging | वळवाचा तडाखा नुकसानदायी

वळवाचा तडाखा नुकसानदायी

Next

राधानगरी : एप्रिल - मेच्या उकाड्याने हैरान झाल्यावर एखादा वळीव पाऊस व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. जेणेकरून उष्णता कमी होऊन उन्हास सुस‘ होतो. यावर्षी वळीव पावसाने मात्र माणसांचे जगणे अस‘ केले आहे. गारपीट, वादळाचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसाचे वातावरण पाहता हा पाऊस वळवाचा की मृगाचा असा प्रश्न पडतो. जणू महिनाभर अगोदर मृग नक्षत्र सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.
गेल्या दीड -दोन महिन्यापासून राज्याच्या काही भागात गारपीटीसह वादळ व पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पीकांसह घरांचेही प्रचंड नुकसान झाले. एरवी हंगामात एक दोन वेळा होणारा वळीव पाऊस सर्वांनाच दिलासा देतो. वाढलेली उष्णता कमी करण्याचे काम हा पाऊस करतो. त्यामुळे थोडे फार नुकसान झाले तरी त्याची प्रतिक्षा केली जाते. यावर्षी प्रचंड गारपीट, वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. पावसाळ्यासातही पाऊस पडत नाही, अशा भागातही त्याचा कहर झाला.
कोल्हापूर जिल्हा व आसपासचा भाग निसर्गाच्या कृपेमुळे भाग्यवान समजला जातो. पण या वर्षीच्या वळीवाने येथेही आपले उग्र रुप दाखविले आहे. मालमत्तांच्या मोठ्या नुकसानीबरोबर वीज कोसळून काहीना जीवही गमवावा लागला.
गेल्या पंधरा दिवसात जिल्‘ाच्या कोणत्या ना कोणत्या भागात पावसाची हजेरी राहिली आहे. खरीपाच्या काढणीला आलेल्या भात, सोयाबीन, सुर्यफुल, भुईमुग अशा पिकाना याचा फटका बसत आहे. उन्हाळी हंगामात कलिंगड पिकाची लागवडी मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीच्या प्रतिकुल हवामानामुळे हे पीक यंदा शेतकर्‍यांच्या अंगलट आले आहे.
दोन-तीन दिवसापासून विचित्र प्रकारचे हवामान सर्वत्र आहे. ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरण नाही. राहून राहून पावसाचा होणारा शिडकावा यामुळे मृग नक्षत्राचा अनुभव महिनाभर आदी येत आहे. शेतीसह सर्वच कामकाजाचे वेळापत्रक कोलमडले आहे. अशा प्रकारचे हवामान पुर्वी कधीही पाहिले नसल्याचे ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जात आहे.
प्रतिनिधी

चौकट
मार्चअखेर व निवडणुकीमुळे अडलेली रस्त्यांची कामे आता सर्वत्र सुरू आहेत. या रोजच्या पावसातही डांबरीकरण सुरू आहे. याचा डांबरावर होणारा विपरीत परिणाम पाहता अशा रस्त्यांच्या टिकण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Web Title: Wreckage is damaging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.