लेखक सुरेशचंद्र गुप्ते यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 07:29 PM2020-10-23T19:29:11+5:302020-10-23T19:31:04+5:30
artist, autharwriter, kolhpaurnews प्रतिभानगर येथील लेखक व कवी सुरेशचंद्र दत्तात्रय गुप्ते (वय ८८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले विनय, नचिकेत, मुलगी संहिता, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कोल्हापूर : प्रतिभानगर येथील लेखक व कवी सुरेशचंद्र दत्तात्रय गुप्ते (वय ८८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले विनय, नचिकेत, मुलगी संहिता, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
गुप्ते यांचे मूळ गाव कळमुंडी (ता. गुहागर). नोकरीनिमित्त ते कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले. येथील मृद्संधारण विभागात पर्यवेक्षक पदावर ३८ वर्षे सेवा केल्यानंतर ते सन १९८९ मध्ये निवृत्त झाले. वाचन, लेखनाची आवड असल्याने त्यांनी शिवाजी विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयामधून एम. ए. आणि वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागामधून बीजेसी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले.
पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून त्यांनी फिल्म ॲप्रिसिएशन अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागामध्ये ते अतिथी प्राध्यापक म्हणून फिल्म जर्नालिझम हा विषय शिकवू लागले. त्यांनी सन १९९२ ते ९५ दरम्यान विद्यार्थ्यांना शिकविले.
गुप्ते यांना वृत्तपत्रांतील विविध विषयांवरील लेख, बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह करण्याची आवड होती. त्यांनी देवदासी या मराठीतील पुस्तकाचे इंग्रजीमध्ये, तर व्हेनडेट्टा या इंग्रजी पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केला होता. त्यांनी विविध विषयांवर लेखन, कविता केल्या आहेत. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे माजी अध्यक्ष विनय गुप्ते यांचे ते वडील होत.