निबंधाच्या पलीकडील लेखन म्हणजे निबंध सरिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:18+5:302020-12-28T04:13:18+5:30
येथील सरस्वती हायस्कूलमधील मराठीचे अध्यापक महावीर कांबळे यांनी लिहिलेल्या ‘निबंधसरिता’ या पुस्तक प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ...
येथील सरस्वती हायस्कूलमधील मराठीचे अध्यापक महावीर कांबळे यांनी लिहिलेल्या ‘निबंधसरिता’ या पुस्तक प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सुरुवातीला संविधानाचे प्रकट वाचन झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. लेखक महावीर कांबळे यांनी लेखन प्रक्रियेतील घटनाक्रमांचा धावता आढावा घेतला. यावेळी उद्योगपती राजेंद्रप्रसाद बोहरा, अमरसिंह माने व वसंत खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
सिद्धनाथ बसागरे यांनी स्वागत व संजय रेंदाळकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास शिवाजी जगताप, मुख्याध्यापक पी. डी. शिंदे, अशोक दास, वैशाली नायकवडे, विभावरी कांबळे, आदी उपस्थित होते. अनुराधा काळे यांनी आभार मानले.
(फोटो ओळी)
२७१२२०२०-आयसीएच-०१
येथील सरस्वती हायस्कूलमधील मराठीचे अध्यापक महावीर कांबळे यांनी लिहिलेल्या ‘निबंधसरिता’ पुस्तकाचे प्रकाशन रणधीर शिंदे यांनी केले.