‘दुय्यम निबंधक’मध्ये दस्तनोंदणी रेंगाळली-संगणक कर्मचारी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:00 AM2018-04-07T01:00:30+5:302018-04-07T01:00:30+5:30

कोल्हापूर : पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचप्रकरणी सहाजणांवर कारवाई झाली असली तरीही जिल्ह्यातील सर्व १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत गेली १६ वर्षे

Writing in 'Sub-Registrar' Wronglane-Computer Employee Reduction | ‘दुय्यम निबंधक’मध्ये दस्तनोंदणी रेंगाळली-संगणक कर्मचारी कपात

‘दुय्यम निबंधक’मध्ये दस्तनोंदणी रेंगाळली-संगणक कर्मचारी कपात

Next
ठळक मुद्दे लाच प्रकरणाचा फटका; नागरिक दिवसभर ताटकळत

कोल्हापूर : पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचप्रकरणी सहाजणांवर कारवाई झाली असली तरीही जिल्ह्यातील सर्व १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत गेली १६ वर्षे ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत काम करणाऱ्या संगणक चालकांना त्याचा फटका बसला आहे. या संगणक चालकांना कामावरून अचानक कमी केल्याने कार्यालयातील दस्तनोंदणी प्रक्रिया रेंगाळली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दस्तनोंदणीसाठी येणाºयांना कार्यालयात दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिपत्याखालील कोल्हापूर शहरातील तीन आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय दुय्यम निबंधक कार्यालयात एक दुय्यम निबंधक अधिकारी, एक लिपिक, एक शिपाई यांसह दोन संगणक चालक व एक खासगी शिपाईवजा सहकारी असे सहा कर्मचारी कार्यरत आहेत. यांपैकी कॉम्प्युटर डाटा एंट्री आॅपरेटर या पदांची भरती शासनाच्या एस.एम. कॉम्युटर्स प्रा. लि., अहमदनगर कंपनीतर्फे ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत केली. २००२ पासून २०१५ अखेरपर्यंत हे सुमारे ३८ कर्मचारी शहरासह तालुकास्तर कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांना तीन ते चार हजार रुपये मानधन देण्यात येत होते; पण ‘बीओटी’चा करार संपल्यानंतरही हे सर्व संगणक चालक एप्रिल २०१८ अखेरपर्यंत दस्त नोंदणीधारकांची डाटा एंट्रीची कामे त्यांच्याकडून मिळणाऱ्या स्वखुशीवर करीत होते.

मात्र, पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयात २८ एप्रिलला लाच घेताना दुय्यम निबंधकांसह महिला लिपिक, शिपाई तसेच दोन संगणक चालक आणि एका खासगी व्यक्तीवर कारवाई झाली. कारवाईत संगणक चालक यांचा कार्यालयाशी काहीही संबंध नसल्याचे कारण पुढे केल्याने सर्वच कार्यालयांतील संगणक चालकांना फटका बसला असून, त्यांना १ मार्चपासून कामावर येण्यास प्रतिबंध केले. परिणामी, दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी प्रक्रियेवेळी ताटकळत बसावे लागते; पण आता चालकांची कपात केल्याने त्यांच्या दस्त स्कॅनसह इतर कामे आता शिपायाला करावी लागत आहेत. काही कार्यालयांत हे दस्त स्कॅनिंगचे काम पक्षकारांकडूनच केले जात आहे. कामाचा अतिरिक्त भार मोजक्याच कर्मचाºयांवर पडू लागला. त्यामुळे दस्तनोंदणीची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी पक्षकारांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.

सोळा वर्षांनंतरही आश्वासनच
शासनाने कंपनीमार्फत २००२ पासून २०१५ पर्यंत जिल्ह्यातील १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत संगणक चालकांची भरती केली. या कर्मचाºयांना ‘सेतू’ कार्यालयातर्फे सेवेत घेण्याबाबत राज्य शासनाकडून आश्वासनावर ठेवले. यावर आधारित हे संगणक चालक सेवेत राहिले. आता अचानक त्यांना प्र्रतिबंध केल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. या कर्मचाºयांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडिक यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
दस्तनोंदणी रेंगाळली
कोल्हापूर शहरात असणाºया दुय्यम निबंधक वर्ग १ करवीर, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४ या कार्यालयांत रोज किमान ४० हून अधिक दस्त नोंदणी केले जात होते. आता संगणक चालकांची कपात केल्याने हे काम मंदावले असून, ते आता रोज १५ ते २० दस्त नोंदणीवर आले आहे.
 

 

दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदीचे काम जबाबदारीचे असल्याने येथे अधिकृत कर्मचारीच हवेत. संगणक चालकांचा करार संपल्याने त्यांची कपात केली. दस्तनोंदणीचे काम सर्वच कार्यालयांत सुरळीत आहे. फक्त शिरोळ आणि हातकणंगले कार्यालयांत दस्तनोंदणीची कामे अधिक असल्याने त्यांचा भार पडत आहे.
- सुंदर जाधव, जिल्हाधिकारी, मुद्रांक

Web Title: Writing in 'Sub-Registrar' Wronglane-Computer Employee Reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.