पोलीस भरतीत ‘बँडस्मन’साठी आज लेखी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:03+5:302021-09-03T04:24:03+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७८ जागांच्या पोलीस भरतीपैकी बँडपथकातील (बँडस्मन) तीन जागांसाठी आज, शुक्रवारी लेखी परीक्षा होत आहे. यासाठी आलेल्या ...

Written exam for 'Bandsman' in police recruitment today | पोलीस भरतीत ‘बँडस्मन’साठी आज लेखी परीक्षा

पोलीस भरतीत ‘बँडस्मन’साठी आज लेखी परीक्षा

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७८ जागांच्या पोलीस भरतीपैकी बँडपथकातील (बँडस्मन) तीन जागांसाठी आज, शुक्रवारी लेखी परीक्षा होत आहे. यासाठी आलेल्या ६२१७ अर्जदारांपैकी पात्र ३७२५ उमेदवारांना लेखी परीक्षेस बसता येणार आहे. सहा केंद्रांवर ही लेखी परीक्षा होत असून त्यासाठी सुमारे १५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

जिल्हा पोलीस दलातील ७८ शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. २०१९ मध्ये या जागांसाठी १५ हजार ७६७ अर्ज दाखल झाले होते. यांतील शिपाई पदासाठी ९ हजार ५५०, तर बँडपथकातील तीन जागांसाठी ६ हजार २१७ अर्ज दाखल झाले. भरती प्रक्रियेत बदल झाल्यानंतर पहिल्यांदा उमेदवारांची लेखी परीक्षा होत आहे.

दरम्यान, बँडपथकातील तीन जागांसाठी आलेल्या अर्जदारांपैकी ३७२५ पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेस बसता येईल. कोल्हापूर शहरातील पाच, तर हातकणंगले येथे एक परीक्षा केंद्र आहे. सकाळी १० ते ११.३० या कालावधीत परीक्षा होत आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना ओळखपत्र (प्रवेशिका) व दोन पेनांव्यतिरिक्त कोणतीही वस्तू अगर मोबाईल परीक्षा केंद्राच्या परिसरात नेण्यास सक्त मनाई आहे.

इतर ७५ पोलीस शिपाई पदासाठी ९५५० अर्ज आले आहेत. त्यांपैकी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दुसऱ्या टप्प्यात होत आहे. त्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

‘सॅक्सोफोन, क्लॅरोनेट’ वाद्यँसाठी भरती

बँडपथकातील ‘सॅक्सोफोन व क्लॅरोनेट’ या दोन वाद्यँसाठी ही तीन पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ही लेखी परीक्षा होत आहे.

परीक्षा केंद्र

१) राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज (दसरा चौक)

२) न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (नागाळा पार्क)

३) श्री विवेकानंद कॉलेज (नागाळा पार्क)

४) दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिर (पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर)

५) सायबर कॉलेज (शिवाजी विद्यापीठ रोड)

६) संजय घोडावत इन्स्टिट्यूट (हातकणंगले)

Web Title: Written exam for 'Bandsman' in police recruitment today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.