कोरोनाकाळात 'झेवियर-२००६' बॅचची ३० लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:27+5:302021-07-08T04:17:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाकाळात कोल्हापुरातील सेंट झेवियर स्कूलच्या २००६ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३० लाखांहून अधिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाकाळात कोल्हापुरातील सेंट झेवियर स्कूलच्या २००६ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३० लाखांहून अधिक रकमेची मदत समाजाला केली आहे. हर्षवर्धन जयवंतराव पाटील-कासारीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मित्रपरिवाराने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्ससह मास्क, सॅनिटायझर, औषधे व अन्नधान्याचे वाटप केले.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे हे उपक्रम सुरू आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन त्यांनी गरजू माणसांबरोबरच भटक्या कुत्र्यांनाही अन्न खाऊ घालण्यासाठी या मित्रमंडळींनी प्राणी कल्याण चॅरिटेबल ट्रस्टला धान्य पुरवठा केला आहे.
हर्षवर्धन पाटील यांना आकाश परदेशी, अंकित गाला, प्रणव वाणी, निखिल माने, पुनित ओसवाल, निखिल मोटवानी, शिवा जाधव, आसिफ मुल्ला, जुबेर खान, रोहित शिर्के आदी मित्रांची साथ मिळाली.
कोट -
नोकरी आणि व्यवसायाच्यानिमित्ताने संपूर्ण आयुष्य हे मिळवण्यासाठीच आहे. परंतु; कोरोनासारख्या महामारीत समाजालाही आपण काहीतरी देण्याची ही वेळ आहे, या भावनेतूनच हे करत गेलो. वर्गमित्रांनीही भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे आत्मिक समाधान मिळाले.
- हर्षवर्धन पाटील
फोटो ओळी : कोल्हापुरातील सेंट झेवियर स्कूलच्या २००६ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३० लाखांहून अधिक रकमेची मदत वाड्या-वस्त्यांवर केली आहे. (फोटो-०७०७२०२१-कोल-सेंट झेवियर)