ए. वाय. पाटील यांच्या वाढदिनी ३६६ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:16+5:302021-04-24T04:24:16+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सर्व सेलच्यावतीने सोळांकूर येथील ...

A. Y. Blood donation of 366 people on Patil's birthday | ए. वाय. पाटील यांच्या वाढदिनी ३६६ जणांचे रक्तदान

ए. वाय. पाटील यांच्या वाढदिनी ३६६ जणांचे रक्तदान

Next

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सर्व सेलच्यावतीने सोळांकूर येथील व्यंकनाथ मंदिरात महारक्तदान शिबिरात ३६६ दात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सीपीआर, कोल्हापूर रक्तपेढीच्या डाॅ. शीतल हारुगले, डॉ. देवीप्रिया, जयवंत कदम तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील रक्तपेढीचे डॉ. महेश गायकवाड, राहुल डोंगरे, मधुकर हाके यांच्या नेतृत्वाखालील टीमने रक्त संकलनासाठी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी आर. वाय. पाटील, भिकाजी एकल, किसनराव चौगले, रामराव इंगळे, अमित पाटील, वाय. डी. पाटील, राजू पाटील, एस. ए. पाटील, प्रा. वाय. एस. पाटील, उल्हास पाटील, संजय जांगनूरे, भरत कुंभार, के. जी. पाटील, विठ्ठल बरगे, विनायक चव्हाण, प्रतीक पाटील, एम. पी. शिंदे, एम. एन. पाटील, आनंदा सावर्डेकर, दिलिप पाटील, रणजित चौगले, श्रीकांत शिर्के, जयदीप चव्हाण, अशोक पाटील, एन. डी. मोरे, अवि पाटील, युवराज पाटील, डी. वाय. पाटील, प्रकाश पाटील, किसन रानमाळे, संपत जाधव, मुन्ना पाटील, नामदेव मुसळे, प्रतीक पाटील, ऋषिकेश पाटील, गोरख पाटील, विकास पाटील, सागर पाटील, विजय पाटील, अशोक नायकवडे, रणजित चौगले, सिकंदर ताशिलदार, शिवाजी पाटील, जी. जी. चौगले, आदी मान्यवर व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ-

सोळांकूर (ता. राधानगरी) येथील व्यंकनाथ मंदिरात ए. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले.

Web Title: A. Y. Blood donation of 366 people on Patil's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.