ए. वाय. पाटील विधानसभा निवडणूक लढवणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:27 AM2021-08-27T04:27:58+5:302021-08-27T04:27:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तुरंबे : राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत जिल्ह्यात अग्रेसर आहे. परंतु तालुक्यातील नेत्यांना राज्यात काम ...

A. Y. Patil will contest the assembly elections | ए. वाय. पाटील विधानसभा निवडणूक लढवणारच

ए. वाय. पाटील विधानसभा निवडणूक लढवणारच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

तुरंबे

: राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत जिल्ह्यात अग्रेसर आहे. परंतु तालुक्यातील नेत्यांना राज्यात काम करण्याची संधी मिळत नाही, याची खंत आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या ताकदीने ए. वाय. पाटील हे निवडणूक लढणार आहेत, असा विश्वास गोकुळचे संचालक व राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष किसन चौगुले यांनी व्यक्त केला.

मजरे कासारवाडा (ता. राधानगरी) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष ए. वाय. पाटील होते.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन राज्यात प्रथम क्रमांकाचे असणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्यातील व राज्याचे नेतृत्व आपल्याला काम करायची संधी देणार असून, आगामी विधानसभा ही आपल्याला लढायची आहे.

यावेळी अनिल साळुंखे यांचे भाषण झाले. सभापती सोनाली पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य बापू पाटील, गौतम कांबळे व गोकुळचे संचालक किसन चौगुले तसेच पक्षाच्या २६ सेलचे तालुका अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. किसन चौगुले यांनी प्रास्ताविक केले. युवराज वारके यांनी स्वागत केले. यावेळी फिरोजखान पाटील, मानसिंग पाटील, नंदू पाटील, सर्जेराव पाटील, भिकाजी एकल, उमेश भोईटे, विनय पाटील, सचिन पाटील, बाळासाहेब देशमुख, यासीन मुजावर, बाळासाहेब खैरे, नेहाल कलावंत, संतोष मेंगाणे, बापू जांभळे, स्मितला जाधव, संजीवनी कदम, मोहन पाटील, विलास हळदे, बंडोपंत किरुळकर, राजू कवडे, स्वप्नील पाटील उपस्थित होते. राम इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. नेताजी पाटील यांनी आभार मानले.

२६ तुरंबे ए वाय पाटील

फोटो ओळी- मजरे कासारवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी संबोधित केले.

Web Title: A. Y. Patil will contest the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.