शिरोळ तालुक्यात २२ गावांत यड्रावकर समर्थक सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:34 AM2021-02-26T04:34:28+5:302021-02-26T04:34:28+5:30
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील २२ गावांमध्ये आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाच्या समर्थकांना सरपंचपदाची संधी मिळाल्याचा दावा यड्रावकर गटाने ...
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील २२ गावांमध्ये आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाच्या समर्थकांना सरपंचपदाची संधी मिळाल्याचा दावा यड्रावकर गटाने केला आहे, तर दोन गावांत उपसरपंच पदाची संधी मिळाली आहे.
तालुक्यतील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये २३ ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन करण्यास बळ मिळाल्याचा दावा राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केला होता. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी स्वीकारून अनेक ठिकाणी वर्चस्व राखण्यात यश मिळाल्याचे यड्रावकर गटाने सांगितले होते. गुरुवारी झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडीमध्ये ३३ पैकी २२ गावांमध्ये यड्रावकर समर्थकांना सरपंच पदाची संधी मिळाली, तर दोन गावांमध्ये यड्रावकर समर्थक उपसरपंच झाल्याची माहिती यड्रावकर गटाकडून देण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा जयसिंगपूर येथील जनसंपर्क कार्यालयात राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फोटो - २५०२२०२१-जेएवाय-०२-आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर