यड्रावकरांनी स्टंटबाजी करत व्यापाऱ्यांशी खेळू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:42+5:302021-07-10T04:16:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कशाच्या आधारावर व्यवसाय सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कशाच्या आधारावर व्यवसाय सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांना अधिकार कोण दिले? यड्रावकर यांनी स्टंटबाजी करत व्यापाऱ्यांशी खेळू नये, असा सल्ला माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तसेच सोमवारी प्रांतांना निवेदन देऊन दुकाने सुरू करणार असल्याची घोषणा केली.
अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याचे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी जाहीर केले होते. परंतु शुक्रवारी सकाळी पोलीस प्रशासनाने शहरात व्यवसाय बंद करा; अन्यथा कारवाई करणार, असा इशारा दिला. त्यामुळे शेट्टी यांनी व्यापाऱ्यांसोबत के. एल. मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करत यड्रावकरांचा निषेध केला.
त्यानंतर आंदोलकांसह शेट्टी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा करून व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. आंदोलनात शहर अध्यक्ष रामदास कोळी, गोवर्धन दबडे, विकास चौगुले, विद्यासागर चराटे, हेमंत वणकुद्रे, विद्याधर पाटील, आदी सहभागी झाले होते.
फोटो ओळी
०९०७२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत सुरू केलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन पोलिसांनी केल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यापाऱ्यांसोबत के. एल. मलाबादे चौकात निदर्शने केली.
छाया-उत्तम पाटील