यशवंत बँक ‘बँको ब्लू रिबन’पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:06+5:302021-09-04T04:30:06+5:30
कोपार्डे : कुडित्रे ता करवीर येथील श्री यशवंत सहकारी बँकेला अविज पब्लिकेशन कोल्हापूरतर्फे व्यवसाय वृद्धी भागातील बँक ऑफ ब्ल्यू ...
कोपार्डे : कुडित्रे ता करवीर येथील श्री यशवंत सहकारी बँकेला अविज पब्लिकेशन कोल्हापूरतर्फे व्यवसाय वृद्धी भागातील बँक ऑफ ब्ल्यू रिबन पुरस्काराने म्हैसूर येथे झालेल्या समारंभात सन्मानित करण्यात आले. खासदार प्रताप सीम्हा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर व सर्व संचालकांनी हा पुरस्कार स्वीकारला.
बँकेने व्यवसाय वृद्धीबरोबर विविध कर्ज योजना ठेव योजना यामध्ये यशस्वी घोडदौड ठेवली आहे. सभासद व खातेदार यांना विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये एटीएम आरटीजीएस तसेच मोबाइल बँकिंगची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. बँकेने १३५ कोटींचा ठेवींचा टप्पा पार केला आहे. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळच्या वतीने मराठा समाजाच्या साडेतीनशे युवकांना अर्थपुरवठा करून व्यवसायासाठी आर्थिक हातभार लावलेला आहे. याची नोंद घेऊन यशवंत बँकेला व्यवसाय वृद्धी विभागातील बँक ऑफ ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षात बँकेने आर्थिक प्रगतीत केलेल्या घोडदौडीची नोंद घेऊन हा पुरस्कार मिळाल्याचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी सांगितले. यावेळी बँक असोसिएशनचे अविनाश शिंदे ज्येष्ठ संचालक राजेंद्र जाधव आप्पासो हुच्चे व रवींद्र घोरपडे उपस्थित होते.
030921\img-20210901-wa0134.jpg
म्हैसूर येथे खासदार प्रताप सिंह यांच्या हस्ते बंको ब्ल्यु रिबन पुरस्काराचे वितरण झाले यावेळी श्री यशवंत सहकारी बँक कुदित्रे चे अध्यक्ष एकनाथ पाटील उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर व सर्व संचालकांनी हा पुरस्कार स्वीकारला