यशवंत बँकेला दोन कोटी ४५ लाख ढोबळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:40+5:302021-02-24T04:25:40+5:30
बँकेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कुंभी कासारी शेतकरी भवनमध्ये पार पडली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर ...
बँकेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कुंभी कासारी शेतकरी भवनमध्ये पार पडली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विषय वाचन संभाजी पाटील, तर अहवाल वाचन कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब कांबळे यांनी केले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून ८० ते ९० तरुणांना कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. विजय पाटील यांनी ४४ लाखांच्या निधीची तरतूद चुकीची असल्याचे सांगताच अध्यक्षांनी, नफ्याच्या प्रमाणात ही गुंतवणूक करावी लागते असे सांगितले.
महादेव चौगुले (आडूर) यांनी गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले होते. पण ते आजही मिळालेले नाही यासाठी ठराव मांडला, तर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी केंद्राच्या शेतकरी कायद्याला विरोध करण्याचा ठराव मांडला. हे दोन्ही ठराव सर्वसंमतीने संमत करण्यात आले.
फोटो
कुडित्रे (ता. करवीर) येथील श्री यशवंत सहकारी बँकेच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष एकनाथ पाटील, उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर व सर्व संचालक.