यशवंत भालकर यांना यशवंत सकाळ रंगोत्सवातून अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:47 PM2019-12-19T18:47:41+5:302019-12-19T19:09:12+5:30
दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी सावली गुलमोहर ग्रुप, रंकाळा आणि चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रंकाळा येथे झालेल्या यशवंत सकाळ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाद्वारे उपस्थितांनी यशवंत भालकर यांच्या स्मृतिला अभिवादन केले.
कोल्हापूर : दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी सावली गुलमोहर ग्रुप, रंकाळा आणि चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रंकाळा येथे झालेल्या यशवंत सकाळ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाद्वारे उपस्थितांनी यशवंत भालकर यांच्या स्मृतिला अभिवादन केले.
याप्रसंगी कोल्हापूरातील युवा चित्रकार सत्यजित निगवेकर, युवा शिल्पकार संतोष खुपेरकर, चित्रकार अभिजीत कांबळे आणि सुलेखनकार मनिपद्यमन यांच्या कलाविष्काराने अवघा रंकाळा पदपथ रंगोत्सवाने नटला.
सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये मोठे योगदान असलेल्या यशवंत भालकर यांचा प्रथम स्मृतिदिन गुरुवारी रंकाळा येथे पार पडला. यशवंत भालकर यांना कोल्हापूर भूषणसह अनेक विक्रमी पुरस्कार मिळवले आहेत.
वृक्षसंवर्धन, रंकाळा बचाव यामुळे त्यांंची निसर्गप्रेमी अशीही ओळख बनलेली आहे. त्यांच्या प्रथम स्मृती दिनी युवा कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि नवनिर्मिती ऊर्जा मिळावी या संकल्पनेने कोल्हापूरात वेगळ्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती, अशी भूमिका यावेळी यशवंत भालकर यांचे चिरंंजीव आणि नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, जेनपाल मगदुम, बाळासाहेब वडगावकर, बाळासाहेब कडोलीकर, गगनविहारे - रानडे, नंदकुमार राणभरे, नितीन - सतीश, संदिप भालकर, सपना भालकर -जाधव, पेटाळ्यातील गोतावळा ग्रुप, कलामहाविद्यालयातील विद्यार्थी आणि यशवंत भालकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.