यादवनगरात तिघांना कोयत्याने,बांबूने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:37 PM2019-02-21T15:37:57+5:302019-02-21T15:39:27+5:30

दूचाकीचे हॅण्डल घासल्याच्या कारणावरुन कोयता व बांबूने तिघांना मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) रात्री घडली. या प्रकरणी पाच जणांवर बुधवारी (दि. २०) रात्री राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला.

In the Yavid Nagar, they were beaten by bamboo | यादवनगरात तिघांना कोयत्याने,बांबूने मारहाण

यादवनगरात तिघांना कोयत्याने,बांबूने मारहाण

Next
ठळक मुद्देयादवनगरात तिघांना कोयत्याने,बांबूने मारहाणपाच जणांवर गुन्हा : दूचाकी हॅण्डल घासल्याचे कारण

कोल्हापूर : दूचाकीचे हॅण्डल घासल्याच्या कारणावरुन कोयता व बांबूने तिघांना मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) रात्री घडली. या प्रकरणी पाच जणांवर बुधवारी (दि. २०) रात्री राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला.

याबाबत शुभम बाळासाहेब पोवार (वय २२, रा. श्रीराम मंडळजवळ, यादवनगर, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली. सद्दाम सत्तार मुल्ला, नावेद मुजावर, मुजम्मील खुदबुद्दीन कुरणे, तोहित खुदबुद्दीन कुरणे (सर्व रा. यादवनगर) व जुनेद मुजावर (रा. सरनाईक वसाहत, यादवनगर) अशी संशयितांची नांवे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, शुभम पोवार हा मंगळवारी रात्री यादवनगर येथून दूचाकीवरुन जात होता. त्याच्या दूचाकीचे हॅण्डल नावेद मुजावरला घासले. दहशत माजविण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी शुभमचे वडिल बाळासाहेब पोवार, दाजी सागर गजानन भोसले ( तिघे रा. मोराळे हॉस्पिटलजवळ, सुभाषनगर) यांना शास्त्रीनगर मैदान व श्रीराम मंडळाजवळ आडविले. त्यांना कोयता व बांबुने मारहाण केली.

यात तिघे जखमी झाले. तसेच त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी पाच संशयितांना गुरुवारपर्यंत अटक करण्यात आली नव्हती. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

संशयित सद्दाम मुल्ला याच्यावर २०१७ ला राजारामपुरी पोलिसात तर मुजम्मील कुरणे याच्यावर राजारामपुरी पोलिसात तीन,कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात एक असे एकूण चार गुन्हे पोलिस दफ्तरी दाखल आहेत.तसेच तोहित कुरणेवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
 

 

Web Title: In the Yavid Nagar, they were beaten by bamboo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.