कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट, नागरिकांसाठी ‘माय प्लँट’ अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:45 AM2018-05-08T00:45:41+5:302018-05-08T00:45:41+5:30

कोल्हापूर : वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याकरिता २५ लाख ७७ हजार ८७० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

This year, Kolhapur district has targeted 26 lakh trees, the 'My Plant' app for the citizens | कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट, नागरिकांसाठी ‘माय प्लँट’ अ‍ॅप

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट, नागरिकांसाठी ‘माय प्लँट’ अ‍ॅप

googlenewsNext
ठळक मुद्दे१ ते ३१ जुलैपर्यंत कार्यक्रम : जिल्हा प्रशासन, वनविभागाकडून तयारी सुरू

प्रवीण देसाई ।
कोल्हापूर : वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याकरिता २५ लाख ७७ हजार ८७० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याची जिल्हा प्रशासन व वनविभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ११ लाख ५०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट हे प्रादेशिक वनविभागाला देण्यात आले आहे.
शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी यंदा २५ लाख ७७ हजार ८७०चे उद्दिष्ट दिले आहे.

यामध्ये प्रादेशिक वनविभागाच्या माध्यमातून ११ लाख ५० हजार, महाराष्टÑ वनविकास महामंडळाच्या माध्यमातून ३ लाख १५ हजार, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ४ लाख ५० हजार, महसूल, आर.टी.ओ., पोलीस, आरोग्य आदी शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून ४ लाख ६२ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
यासाठी खड्डे खणण्याचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत रोपे लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी दररोज रोप लागवडीची माहिती आॅनलाईन पद्धतीने भरली जाणार आहे.त्याचबरोबर नागरिकांनाही या योजनेत सहभागी होता यावे यासाठी सरकारने ‘माय प्लँट’ हे अ‍ॅपही विकसित केले आहे. त्यामध्ये नागरिक रोप लागवड करून त्याची माहिती भरू शकतात.
या रोप लागवडीची गणतीही शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात होणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत साडेचार लाख रोपे ही ग्रामपंचायतींना जागेवर पोहोच केली जाणार आहेत. त्याचबरोबर लावलेल्या रोपांना डिसेंबरनंतरपाणी देण्याची सोयही करण्यात आली आहे.


शेंडा पार्क परिसरात
५० हजार झाडे लावणार

शेंडा पार्क परिसरातील कृषि महाविद्यालयाच्या जागेवर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. सध्या दीड फूट रूंद व लांबीचे ३० हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. दोन खड्ड्यांमधील अंतर ३ मीटर इतके आहे. या ठिकाणी मातीची चाचणी घेऊन कोणती झाडे लावता येतील यासाठी दोन दिवसांत सामाजिक वनीकरण व कृषी महाविद्यालयाच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे.

Web Title: This year, Kolhapur district has targeted 26 lakh trees, the 'My Plant' app for the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.