पन्हाळगडावर यंदा साध्या पद्धतीने शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:22 AM2021-02-12T04:22:22+5:302021-02-12T04:22:22+5:30

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना ...

This year Shiva Jayanti is celebrated in a simple manner at Panhalgad | पन्हाळगडावर यंदा साध्या पद्धतीने शिवजयंती

पन्हाळगडावर यंदा साध्या पद्धतीने शिवजयंती

Next

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्याला परवानगी नसेल, अशी माहिती नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन धडेल यांनी केले. १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. शिवजयंतीला अनेक गडकिल्ल्यांवरुन शिवज्योत नेली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे दीर्घकाळ वास्तव्य असणाऱ्या ऐतिहासिक पन्हाळगडावरूनही शिवज्योत नेली जाते. त्यासाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे यासह इतर जिल्ह्यांतून शिवभक्त ऐतिहासिक पन्हाळगडावर दाखल होत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळगडावर शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांनी येऊ नये, असे आवाहन नगराध्यक्षा धडेल यांनी केले आहे.

Web Title: This year Shiva Jayanti is celebrated in a simple manner at Panhalgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.