यंदाची दिवाळी हरित फटाक्यांसंगे, चुटपुट, भुईचक्र, फुरफुर बाजे, कारंजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:49 PM2020-11-13T12:49:33+5:302020-11-13T12:50:51+5:30
Crackers Ban, envoirnement, kolhapurnews राष्ट्रीय हरित लवादाने दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण पातळीत होणारी वाढ ही गंभीर बाब असल्याचे मानून अशा फटाक्यांऐवजी कमी आवाज, कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाके विक्रीस मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदा बहुतेक स्टॉल्सवर असे हरित फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कोल्हापूर : राष्ट्रीय हरित लवादाने दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण पातळीत होणारी वाढ ही गंभीर बाब असल्याचे मानून अशा फटाक्यांऐवजी कमी आवाज, कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाके विक्रीस मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदा बहुतेक स्टॉल्सवर असे हरित फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
दिवाळी म्हटले की, दीपोत्सव आणि आकर्षक रंगसंगतीच्या फटाक्यांची आतषबाजी ही ठरलेली असते. याकाळात फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचा परिणाम म्हणून अनेकांना दमा, खोकला आणि सर्दीसारखे आजार होतात. त्याचा फुप्फुसांवरही गंभीर परिणाम होतो.
एकीकडे वाहनांमधून उत्सर्जित कार्बन डाय ऑक्साईडमुळे वायू प्रदूषण वाढत आहे. त्याच्या जोडीला फटाक्यांमधूनही प्रदूषण होते. त्यामुळे हरित लवादाने हरित फटाके विक्रीस मान्यता दिली आहे. त्यानुसार कोल्हापुरात शिवकाशी येथील नेहमीच्या फटाक्यांसह हिरवे फटाकेही बाजारपेठेत विक्रीसाठी आहेत. यामध्ये चुटपुट, भुईचक्र, फुरफुर बाजे, कारंजे यांचा समावेश आहे.
या घटकांमुळे होते प्रदूषण
बेरियम नायट्रेट, सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन ऑक्साईड, कॉपर झिंक, सोडियम, लीड मॅग्नेशियम आवाज आणि धूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामुळे हवेचे प्रदूषण होते. हरित फटाक्यांत क्रॅकर्स पदार्थांऐवजी कमी बॅरियमसह समान वैकल्पिक घटकांचा वापर करतात. हे ध्वनी आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करते.
यावर्षी हरित फटाके बाजारात उपलब्ध आहेत. कंपन्यांनी त्याचे प्रमाणपत्र विक्रेत्यांनाही पाठविले आहे. पुढच्या वर्षी विक्रीसाठी बहुतेक फटाके हरित असतील.
- संदीप देसाई,
फटाका विक्रेता