यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला वेगळीच झळाळी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:30+5:302021-08-15T04:25:30+5:30

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन आज (रविवारी) सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सकाळी ...

This year's Independence Day is different ... | यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला वेगळीच झळाळी...

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला वेगळीच झळाळी...

Next

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन आज (रविवारी) सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होईल. याशिवाय शहर व जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालये, पक्ष, संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वाजरोहण होणार आहे. या राष्ट्रीय सणाच्या पूर्वसंध्येला शहरात चौकाचौकात जिलेबी, गुलाबजाम अशा मिठाईचे स्टॉल सजले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई, वडील तसेच कोरोना योद्धा डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्यसेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. याशिवाय शहरातील विविध पक्षांची कार्यालये, संस्था, संघटनांच्यावतीने ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानिमित्त चौकाचाैकांमध्ये ध्वजारोहणाच्या परिसराची स्वच्छता व समर्पक सजावट करण्यात आली आहे. मोठ्या, लहान राष्ट्रध्वजांसह तिरंग्याच्या रंगातील क्रेपरोल, गळ्यातले स्कार्फ, बॅचेस अशा साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. यादिवशी जिलेबी, लाडू, गुलाबजाम अशी मिठाई वाटण्याची पद्धत आहे. घराघरातदेखील या गोड पदार्थांची रेलचेल असते. यानिमित्त शहरातील चौकाचौकात मांडव घालून मिठाईचे स्टॉल सजले आहेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्लास्टिकचे झेंडे वापरू नयेत व कोरोनाविषयी नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

---

लोकमत कार्यालयात ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘लोकमत’च्या एमआयडीसी येथील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. कोल्हापुरातील वितरण विभागाचे कर्मचारी संग्राम पायमल व सांगली येथील कर्मचारी शशिकांत मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

--

‘चेतना’तील विद्यार्थ्यांना स्मार्टफोन

शेंडा पार्क येथील चेतना विकास मंदिरमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या उपस्थितीत सकाळी सव्वादहा वाजता ध्वजारोहण होणार आहे. यावेळी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट मोबाईल फोन, शिलाई मशीनचे वाटप, आरोग्यदायी कायाकल्प प्रकल्पाचा प्रारंभ होणार आहे.

---

Web Title: This year's Independence Day is different ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.