यंदाची शाहू जयंती राधानगरी धरणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:47+5:302021-06-22T04:17:47+5:30

कागल : राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराजांची शनिवारी (दि.२६) होणारी १४७ वी जयंती राधानगरी धरणावर साजरी करण्यात येणार असून ...

This year's Shahu Jayanti on Radhanagari Dam | यंदाची शाहू जयंती राधानगरी धरणावर

यंदाची शाहू जयंती राधानगरी धरणावर

Next

कागल : राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराजांची शनिवारी (दि.२६) होणारी १४७ वी जयंती राधानगरी धरणावर साजरी करण्यात येणार असून छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव समितीच्यावतीने त्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. समरजित घाटगे म्हणाले की सर्वसाधारणपणे जयंतीदिवशी पुतळा व फोटो पूजन केले जाते पण राजर्षी शाहूंचे कार्य लोकांसमोर येण्यासाठी त्यांनी उभारलेल्या कार्याच्या ठिकाणी ही जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी हे धरण बांधले. कोल्हापूर संस्थानातील शेतकऱ्यांच्या शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे. हा उद्देश होता. गतवर्षी आम्ही जयंती दिवशी या कार्यस्थळावर जाऊन नतमस्तक झालो. यावेळी तेथील स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी पुढील वर्षी ही जयंती राधानगरी धरण येथे साजरी करा, अशी मागणी केली म्हणून यावर्षी तेथे ही जयंती साजरी करत आहोत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करत शाहूप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

चौकट

● शाहूंचे अलौकिक कार्य समोर येण्यासाठी राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचे बंधू कागलचे तत्कालिन अधिपती पिराजीराव घाटगे ऊर्फ बापूसाहेब महाराज यांनी जलसिंचनाचे स्वप्न नुसते पाहिले नाही तर सत्यात उतरवले. राजर्षी शाहूंचे कार्य आजच्या पिढीसमोर येत राहिले पाहिजे म्हणून हा जन्मोत्सव सोहळा अशा पद्धतीने सुरू करत आहोत. धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील व्यक्तींचा सत्कार तसेच त्यांच्यातील जोडप्यांच्या हस्ते जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.

Web Title: This year's Shahu Jayanti on Radhanagari Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.