यंदाची शाहूजयंती राधानगरी धरणावर : घाटगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:23+5:302021-06-24T04:18:23+5:30
घाटगे म्हणाले, सर्वसाधारणपणे जयंतीदिवशी पुतळा व फोटो पुजन केले जाते. पण राजर्षी शाहूंचे कार्य लोकांसमोर येण्यासाठी त्यांनी उभारलेल्या कार्याच्या ...
घाटगे म्हणाले, सर्वसाधारणपणे जयंतीदिवशी पुतळा व फोटो पुजन केले जाते. पण राजर्षी शाहूंचे कार्य लोकांसमोर येण्यासाठी त्यांनी उभारलेल्या कार्याच्या ठिकाणी ही जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी हे धरण बांधले. कोल्हापूर संस्थानातील शेतक-यांच्या शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे. हा उद्देश होता. गतवर्षी आम्ही जयंती दिवशी या कार्यस्थळावर जाऊन नतमस्तक झालो. या वेळी तेथील स्थानिक नागरीक व शेतक-यांनी पुढील वर्षी ही जयंती राधानगरी धरण येथे साजरी करा, अशी मागणी केली. म्हणून या वर्षी तेथे ही जयंती साजरी करीत आहोत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करीत शाहूप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शाहूंचे अलौकिक कार्य समोर येण्यासाठी
राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचे बंधू कागलचे तात्कालीन अधिपती पिराजीराव घाटगे ऊर्फ बापूसाहेब महाराज यांनी जलसिंचनाचे स्वप्न नुसते पाहिले नाही तर सत्यात उतरवले. राजर्षी शाहूचे कार्य आजच्या पिढीसमोर येत राहिले पाहिजे म्हणून हा जन्मोत्सव सोहळा अशा पद्धतीने सुरू करीत आहोत. धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतक-यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा सत्कार तसेच त्यांच्यातील जोडप्यांच्या हस्ते जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.