यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवकालीन होनच्या साक्षीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:29+5:302021-06-06T04:17:29+5:30

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून खासदार संभाजीराजे व शिवप्रेमींकडून सुरू असलेल्या शिवकालीन सोन्याच्या होनच्या शाेधमोहिमेला शिवराज्याभिषेक दिनाच्या मुुहूर्तावर ...

This year's Shiv Rajyabhishek ceremony is a testimony to the Shiva period | यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवकालीन होनच्या साक्षीने

यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवकालीन होनच्या साक्षीने

Next

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून खासदार संभाजीराजे व शिवप्रेमींकडून सुरू असलेल्या शिवकालीन सोन्याच्या होनच्या शाेधमोहिमेला शिवराज्याभिषेक दिनाच्या मुुहूर्तावर यश मिळाले आहे. हे होन रायगड येथीलच एका महिलेकडे सापडले असून आज रविवारी ते संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

दुर्गराज रायगडावर उत्खनन सुरू असून त्याअंतर्गत अनेक शिवकालीन वस्तू, साहित्य सापडत आहेत. काही दिवसांपूर्वी एक सोन्याची बांगडीदेखील येथे सापडली आहे. जवळपास दोन अडीच वर्षांपूर्वी रायगड येथील एका महिलेला शिवकालीन सोन्याचे होन सापडले होते. मात्र ही बाब लपवण्यात आली. त्यानंतर तब्बल वर्षभराने ही बाब कळल्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी २९ डिसेंबर २०१९ रोजी फेसबुक पेजवर होनचे छायाचित्र व दुर्गराज रायगडवर मिळालेला सुवर्ण होन कोठे गायब झाला, ही पोस्ट टाकली होती. त्यानंतर या गोष्टीला वाचा फुटली आणि होनची शोधमोहीम सुरू झाली. खासदार संभाजीराजे यांनीदेखील ज्यांच्याकडे हा राष्ट्रीय ठेवा आहे त्यांनी तो रायगड प्राधीकरण किंवा पुरातत्व खात्याकडे जमा करावा, असे आवाहन करून त्या व्यक्तीला बक्षीस देवू असे जाहीर केले.

गेल्या दीड वर्षाच्या या शोधमोहिमेला यश आले असून या महिलेला शोधून तिच्याकडेच होन असल्याची खात्री करून ते सुरक्षित ठेवण्यात आले आहे. आज रविवारी रायगडावर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन सोहळा होणार आहे. यावेळी हा होन खासदार संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर होन रायगड प्राधीकरण किंवा पुरातत्व खात्याच्या अखत्यारित ठेवण्यात येणार आहे.

---

शिवकालीन होन हे केवळ चलन नाही तर स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक, आपली अस्मिता आहे, राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडाच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या होनच्या साक्षीने यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.

खासदार संभाजीराजे

--

फोटो नं ०५०६२०२१-कोल-शिवकालीन होन०१,०२

---

Web Title: This year's Shiv Rajyabhishek ceremony is a testimony to the Shiva period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.