आनंदमय जीवनासाठी योग हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:38+5:302021-03-23T04:26:38+5:30

येथील योगविद्या धामतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यान आणि योग स्पर्धेतील यशस्वितांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुरेखा वाली होत्या. ...

Yoga is the only option for a happy life | आनंदमय जीवनासाठी योग हाच पर्याय

आनंदमय जीवनासाठी योग हाच पर्याय

Next

येथील योगविद्या धामतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यान आणि योग स्पर्धेतील यशस्वितांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुरेखा वाली होत्या.

दुर्गवडे म्हणाल्या, शासनाने स्त्रियांच्या संरक्षणासाठी कायद्यामध्ये विविध तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे महिलांनी शरीराने आणि मनाने सदृढ बनावे.

वाली म्हणाल्या, आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. त्यामुळे आरोग्य आणि निरोगी जीवनातदेखील ती पुढे असायला हवी.

याप्रसंगी योग स्पर्धेतील यशस्वी प्रीती बेळगांवकर, श्रृती माळगी, जयश्री चराटी, पूजा जाधव, पुष्पा बस्ताडे, मंजू दड्डी, सुलोचना मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पल्लवी माने, शारदा आजरी, सविता मोहिते, महादेवी मोळदी, सविता तुरबतमठ यांची मनोगते झाली. उज्ज्वला वंदाळे यंनी विश्वकल्याण प्रार्थना घेतली.

कार्यक्रमास शिवगोंडा खापरे, संतान बारदेस्कर, सदानंद वाली, बाबूराव खोत, विठ्ठल मोरे, नंदकुमार मोरे, माधुरी गुंडप आदी उपस्थि होते.

विद्या तेलवेकर यांनी सूत्रसंचालन केले. मंजू दड्डी यांनी आभार मानले.

Web Title: Yoga is the only option for a happy life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.