गोकुळमधील विजयाचे शिल्पकार आपण आहात: पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:06+5:302021-05-06T04:25:06+5:30

यावेळी ते पुढे म्हणाले, माझ्या विजयात आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान मोलाचे ठरले. म्हणूनच हा विजयाचा टप्पा पार करू ...

You are the architect of victory in Gokul: Patil | गोकुळमधील विजयाचे शिल्पकार आपण आहात: पाटील

गोकुळमधील विजयाचे शिल्पकार आपण आहात: पाटील

Next

यावेळी ते पुढे म्हणाले, माझ्या विजयात आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान मोलाचे ठरले. म्हणूनच हा विजयाचा टप्पा पार करू शकलो. कोरोनासारखी महामारी असताना आपण सर्वांनी अपार कष्ट घेतले, हे व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत.

यावेळी माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दूध उत्पादक घटकातला श्रमजीवी घटक असलेला दूध उत्पादक शेतकरी याचे जीवनमान उंचावण्याची संधी या विजयाने मिळाली आहे. सहकार काय असतं, कसं चालवलं जातं, याचा अभ्यास असलेले रणजित पाटील गोकुळमध्ये गौरवशाली काम करतील, असा आशावाद व्यक्त केला. या रणधुमाळीत काम केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजीत करण्यात आली.

यावेळी विश्वनाथ कुंभार, बापूसोा आरडे, मधुआपा देसाई, बाळकाका देसाई, सुनील कांबळे, के. ना. पाटील, आर. व्ही. देसाई, विठ्ठलराव कांबळे, दत्तात्रय पाटील, संग्राम देसाई, संतोष मेंगाणे, बाळ जाधव, विकास पाटील, विजय गुरव आदींसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी :

मुदाळ (ता. भुदरगड) येथे फटाक्यांच्या आतषबाजीत व गुलालाच्या उधळणीत जल्लोषी स्वागत केल्यानंतर बोलताना नूतन संचालक रणजित पाटील, शेजारी माजी आमदार के. पी. पाटील, विश्वनाथ कुंभार आदी.

Web Title: You are the architect of victory in Gokul: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.