समाजकार्य करायला पदाची गरज नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:28 AM2021-08-25T04:28:56+5:302021-08-25T04:28:56+5:30

सांगरुळ : समाजकार्य करायला पद किंवा सत्ता असावीच असे नाही. समाजकार्य रक्तात असावे लागते. सर्वसामान्य लोकांची नाळ असावी लागते, ...

You don't need a post to do social work | समाजकार्य करायला पदाची गरज नसते

समाजकार्य करायला पदाची गरज नसते

Next

सांगरुळ : समाजकार्य करायला पद किंवा सत्ता असावीच असे नाही. समाजकार्य रक्तात असावे लागते. सर्वसामान्य लोकांची नाळ असावी लागते, असे प्रतिपादन देवराज नरके यांनी केले. सांगरुळ (ता. करवीर) येथे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगरुळ गावातील पूरग्रस्त नागरिक ज्यांच्या घरात पुराचे पाणी आले होते. अशा सर्व लोकांना संसार उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर होते.

यावेळी देवराज नरके म्हणाले करवीर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यापुढे महापूर दरवर्षी येणारच त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे. आम्ही चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्य व लागेल ती मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नरके यांनी सांगितले. यावेळी कुमार कपडे म्हणाले माजी आमदार चंद्रदीप नरके हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिले आहेत मतदारसंघात मदत करत असताना गट-तट बाजूला ठेवून ते सर्वसामान्य माणसात मिसळून काम करतात. ही त्यांची वेगळी ओळख असून आता त्यांनी पदावर नसतानाही प्रत्येक गावातील पूरग्रस्तांना मदत करण्याचा लावलेला सपाटा लक्षात घेता त्यांचे समाजाभिमुख काम आदर्शवत असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच सुशांत नाळे, तंटामुक्त अध्यक्ष कृष्णात खाडे, जनार्दन खाडे, प्रशांत नाळे, प्रशांत खाडे, आनंदा इंगळे, दत्तात्रय सुतार, सर्जेराव मगदूम, ग्राम विकास अधिकारी पांडुरंग बिडकर यांच्यासह पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळी

सांगरूळ येथे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना संसारोपयोगी साहित्य वाटप करताना युवा नेते देवराज नरके कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर उपसरपंच सुशांत नाळे, कृष्णात खाडे आदी.

Web Title: You don't need a post to do social work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.