कोपार्डेत मोटारसायकल अपघातात तरुण ठार

By admin | Published: November 1, 2015 12:51 AM2015-11-01T00:51:08+5:302015-11-01T00:56:41+5:30

गाडीवरील ताबा सुटला

Young killed in a motorcycle accident in Kopard | कोपार्डेत मोटारसायकल अपघातात तरुण ठार

कोपार्डेत मोटारसायकल अपघातात तरुण ठार

Next

कोपार्डे : कोपार्डे (ता. करवीर) येथे ताबा सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. तेजपाल प्रभाकर कांबळे (वय २७, रा. पाटपन्हाळा, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री उशिरा झाला असावा, अशी घटनास्थळावर चर्चा होती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तेजपाल कांबळे (जाधव) हा कोल्हापूर येथे डी. मार्ट या शॉपिंग सेंटरमध्ये कामाला होता. रात्री दहानंतर डी. मार्ट बंद झाल्यानंतर तो कामावरून आपल्या गावी पाटपन्हाळ्याला परतत असता कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील कोपार्डे गावच्या पूर्वेस असणाऱ्या गणेश नाल्यातील एका नागमोडी वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला असावा. यामुळे विरुद्ध बाजूला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर तो चालवत असलेली मोटारसायकल आदळली. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यासह मोटारसायकलही रस्त्याशेजारी असणाऱ्या नाल्यात पडली होती. या ठिकाणी गवत व झुडपे असल्याने हा अपघात कोणाच्याही लवकर लक्षात आला नाही. रात्री एमआयडीसीतून कामावरून परतत असणाऱ्या काही युवकांना रस्त्यावर फुटलेल्या अवस्थेतील मोबाईल दिसला. या युवकांनी रस्त्याच्या नाल्यात पाहिले असता तेजपाल व त्याची मोटारसायकल दिसली. या युवकांनी मोबाईलमधील सीमकार्ड आपल्या मोबाईलमध्ये घालून फोन केला असता हा युवक पाटपन्हाळा येथील असल्याचे लक्षात आले. त्याच्या नातेवाइकांना या अपघाताबाबत कल्पना मिळाल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी आले. त्यांनी तेजपालला कोल्हापूर येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. तेजपालच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ आहेत.

Web Title: Young killed in a motorcycle accident in Kopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.