या युवकहो..! करिअरच्या अचूक वाटा शोधायला!
By admin | Published: June 10, 2015 11:01 PM2015-06-10T23:01:19+5:302015-06-11T00:20:16+5:30
‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ : सांगलीत १७ व १८ रोजी विविध कार्यक्रम व प्रदर्शन; एकाच छताखाली सर्व प्रश्नांची उत्तरे
सांगली : युवकांच्या करिअरविषयक अनेक प्रश्नांसाठी अचूक उत्तर असलेले ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन सांगली येथे १७ व १८ जूनरोजी होणार आहे. प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्यंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. शिवाय विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्यांच्या करिअरच्या ‘उद्या’ला आजच भेटण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
जून महिना सुरु झाला की, आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती शुल्क भरावे लागणार, अनुदान मिळणार काय, असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे राहतात. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’ समूहाने ‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे.
सांगलीमध्ये १७ व १८ जूनरोजी राम मंदिरजवळील कच्छी जैन भवन येथे हे प्रदर्शन होईल. पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरसाठीच्या, शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, प्रश्न असतात. त्या शंकांचे निराकरण आणि प्रश्नांना अचूक उत्तरे या प्रदर्शनात मिळतील. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने, पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येणार आहे. (प्रतिनिधी)
१८ जून २0१५
सकाळी ११ वाजता ‘सायन्स पंडित’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. यासाठी विजेत्या प्रथम क्रमांकास ३ हजाराचे, द्वितीय क्रमांकास २ हजाराचे, तर तृतीय क्रमांकासाठी १ हजाराचे गिफ्ट हॅम्पर दिले जाणार आहे. उत्तेजनार्थ तीन विजेत्यांना प्रत्येकी ५00 रुपयांच्या तीन भेटवस्तू दिल्या जातील.
दुपारी १२ वाजता कर्नल प्रदीप ढोले यांचे ‘लष्कर आणि नौदलातील करिअरची संधी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
दुपारी १२.३0 वाजता बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
२.३0 वाजता ‘अपयशातून यशाकडे’ या विषयावर शर्वरी विशाल ताथवडेकर यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३ वाजता डॉ. नामदेव कस्तुरे यांचे ‘स्पर्धा परीक्षा आणि करिअरची संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
३.३0 वाजता ‘सांगली एज्युकेशनल आयडॉल’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ५ हजाराचे, द्वितीय क्रमांकास ३ हजाराचे, तर तृतीय क्रमांकास २ हजाराचे गिफ्ट हॅम्पर दिले जाणार आहेत. याशिवाय उत्तेजनार्थ पाचजणांना प्रत्येकी ५00 च्या भेटवस्तू दिल्या जातील. ५ वाजता कोल्हापूर येथील सुहास राजेभोसले यांचे ‘करिअरच्या वाटा’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
१७ जून २0१५
दुपारी १२.३0 वाजता जनरल नॉलेज (सामान्यज्ञान) स्पर्धा होणार असून दहावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्यांना यामध्ये विनामूल्य प्रवेश घेता येईल. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास ५ हजाराचे, द्वितीय क्रमांकास ३ हजाराचे आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजाराचे गिफ्ट हॅम्पर (भेटवस्तू) देण्यात येईल. याशिवाय उत्तेजनार्थ पाच विजेत्यांना ५00 रुपयांच्या भेटवस्तू देण्यात येतील. नावनोंदणी कार्यक्रमस्थळी दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात येईल.
दुपारी २.३0 वाजता दहावीच्या परीक्षेत ८0 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे.
दुपारी ४.३0 वाजता डॉ. प्रदीप पाटील यांचे ‘विद्यार्थी आणि पालक’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.