उत्तूरजवळील अपघातात गडहिंग्लजचा युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 19:22 IST2020-12-30T19:21:47+5:302020-12-30T19:22:45+5:30
Bike accident kolhpaur-उत्तूर-निपाणी मार्गावर दुचाकीची कारला धडक बसून झालेल्या अपघातात ओंकार विजयकुमार पाटील (वय २५, मूळ गाव भादवणवाडी, ता. आजरा, सध्या रा. सिद्रामलनी, गडहिंग्लज) हा युवक ठार झाला. हा अपघात सायंकाळी सातच्यासुमारास घडला. याबाबत आश्लेश देवदास आजगेकर (आजरा) यांनी पोलिसात वर्दी दिली.

उत्तूरजवळील अपघातात गडहिंग्लजचा युवक ठार
उत्तूर : उत्तूर-निपाणी मार्गावर दुचाकीची कारला धडक बसून झालेल्या अपघातात ओंकार विजयकुमार पाटील (वय २५, मूळ गाव भादवणवाडी, ता. आजरा, सध्या रा. सिद्रामलनी, गडहिंग्लज) हा युवक ठार झाला. हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास घडला. याबाबत आश्लेश देवदास आजगेकर (आजरा) यांनी पोलिसात वर्दी दिली.
अधिक माहिती अशी की, ओंकार हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आपले काम संपवून मोटार ड्युक नं (एमएच ११सी. ए. ०२११) वरून गडहिंग्लजकडे जात होता, यावेळी समोरुन येणाऱ्या पिक गाडीस ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या अल्टो कारला (एमएच ०२ बी.डी.२६६६) धडक बसली. त्यानंतर दुचाकी फरफटत फोर्ड फिगो गाडी नं. (एमएच ०९ , सी. एम. ६०५४ ला धडकली.
धडक इतकी जोरात होती की ओंकार रस्त्यावर पडल्याने डोक्यास गंभीर मार लागला. त्याला आपटे फौंडेशनच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे नेण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी, भाऊ असा परिवार आहे. आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.
हेल्मेट न०हते
पाच वर्षांपासून ओंकार हा जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून भरती झाला होता. तो प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तूर येथे काम करीत होता . काम संपवून घरी जात असताना उत्तूर- निपाणी रस्त्यानजीक साखरू बाई पाटील यांच्या घराजवळ अपघात झाला. त्यावेळी त्याच्या डोक्यास हेल्मेट नव्हते. आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.