अपघातातील जखमी इंगळीच्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:18+5:302021-09-02T04:52:18+5:30

निपाणी : कागलहून निपाणीकडे येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन बाळासो आंबी ...

Young man injured in accident dies | अपघातातील जखमी इंगळीच्या तरुणाचा मृत्यू

अपघातातील जखमी इंगळीच्या तरुणाचा मृत्यू

Next

निपाणी : कागलहून निपाणीकडे येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन बाळासो आंबी (वय ४० रा. इंगळी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील खरी कॉर्नर येथे घडला होता.

अधिक माहिती अशी की, सचिन हे आपली दुचाकी (क्र एमएच ०९ एटी २२४४) वरून कागलहून निपाणी येथे नातेवाईकांना भेटायला येत होते. या वेळी खरी कॉर्नर येथे अज्ञान वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुली, भाऊ असा परिवार आहे. हातकणंगले पंचायत समितीच्या सदस्य वैजयंती आंबी यांचे ते पुत्र होते.

फोटो ३१ सचिन आंबी

Web Title: Young man injured in accident dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.