तरुणांनो कोरोनाबाबत भ्रमात राहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:48+5:302021-05-08T04:23:48+5:30

: मुरगूड ग्रामीण रुग्णालयाला भेट मुरगूड :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे ...

Young people, don't be confused about Corona | तरुणांनो कोरोनाबाबत भ्रमात राहू नका

तरुणांनो कोरोनाबाबत भ्रमात राहू नका

Next

: मुरगूड ग्रामीण रुग्णालयाला भेट

मुरगूड :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यासह सर्वांनीच मला काय होते, असा फाजील आत्मविश्वास बाळगून भ्रमात राहू नका. नागरिकांनी दुखणे अंगावर काढू नये, असे आवाहन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.

मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील भेटी वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी येथील केंद्रांतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत माहिती घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली, तसेच या विभागात मागणीच्या प्रमाणात लस पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. डवरी, डॉ. अमोल पाटील यांच्यासह शिंदेवाडीचे सरपंच दत्तामामा खराडे, शाहू कृषी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस, सुशांत मांगोरे, अमर चौगुले, विजय राजगिरे, सदाशिव गोधडे, युवराज कांबळे, सुनील कांबळे, संग्राम साळोखे आदी उपस्थित होते.

चौकट

अभिमान कोरोना योद्ध्यांचा

यावेळी घाटगे यांनी या रुग्णालयात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या सुरू असलेल्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले व आपण करीत असलेल्या सेवेचा मला अभिमान आहे. महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदारी, लहान मुलांचे संगोपन, स्वतःचे आरोग्य सांभाळून सेवा कर्तव्य पार पाडावे लागत आहे, हे अभिमानास्पद आहे. आपल्याला कोणतीही अडचण आली तर कधीही संपर्क करा. आपल्या पाठीशी मी नेहमीच ठामपणे उभा आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

फोटो ओळ :- मुरगूड येथे ग्रामीण रुग्णालयातील भेटीवेळी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे. सोबत डॉ. डी. बी. डवरी, डॉ. अमोल पाटील, दत्तात्रय खराडे.

Web Title: Young people, don't be confused about Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.