कौशल्य विकासास तरूणांनी प्राधान्य द्यावे

By admin | Published: April 26, 2015 11:16 PM2015-04-26T23:16:58+5:302015-04-27T00:15:22+5:30

नरेंद्र जाधव : जयसिंगपुरात श्री रवळनाथ संस्थेच्या शाखेचे उद्घाटन

Young people should be given priority for skill development | कौशल्य विकासास तरूणांनी प्राधान्य द्यावे

कौशल्य विकासास तरूणांनी प्राधान्य द्यावे

Next

जयसिंगपूर : कायदा व अर्थशास्त्र या दोन गोष्टींचे ज्ञान मनुष्यास असणे गरजेचे आहे. देशाच्या विकासात आर्थिक बलस्थान महत्त्वाचे असून, शिक्षण व कौशल्य विकासास आजच्या तरुण युवा पिढीने प्राधान्य देणे गरजेचे आहे. शासनानेही नवनवे उपक्रम राबवून त्यादृष्टीने योग्य पावले उचलली तरच भारत महासत्ता बनेल, यासाठी इच्छाशक्तीची खरी गरज आहे, असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी मांडले. श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटी आजरा (मल्टी-स्टेट) या संस्थेच्या जयसिंगपूर येथील शाखा उद्घाटनप्रसंगी भारतीय ‘अर्थकारण : दशा आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. जाधव बोलत होते. तत्पूर्वी, संस्थेच्या येथील शाखेचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा सुनीता खामकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, उपाध्यक्ष प्राचार्य आर. एस. निळपणकर, शाखाध्यक्ष महावीर चौगुले, अनिल घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय व्यवस्थेतील विकासाच्या दराबाबत बोलताना डॉ. जाधव म्हणाले, १९७४ ला हरितक्रांतीच्या माध्यमातून विकासाला खरी सुरुवात झाली. त्यानंतर १९९१ साली संगणक, टेलिकॉम या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलाच्या प्रक्रियेला आणखी चालना मिळाली. गेल्या शंभर वर्षांत जेवढा बदल झाला नाही तो १९९१ नंतर झाला आहे. ‘अच्छे दिन’ येणार यातून केंद्र सरकारने मांडलेले बजेट तितकेच चांगले व वाईटही दिसून येत आहे. यामध्ये कृषी क्षेत्राची बोळवणच दिसून आली, शिक्षण व कौशल्य विकासाला प्राधान्य दिले गेले नाही. एकीकडे गुंतवणुकीला चालना दिली, तर दुसरीकडे बचत वाढीसाठी चालना दिली गेली नाही. आर्थिक विकासाचा दर टिकविणे हेच भारतासमोर आव्हान आहे. आज युवाशक्तीचे बलस्थान मोठ्या प्रमाणात आहे. या युवाशक्तीच्या माध्यमातून आर्थिक विकासास चालना देण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलून, येत्या १५ वर्षांत आर्थिक विकासाचा दर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी दीपप्रज्वलन व इशस्तवनाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. स्वागत आर. एस. निळपणकर यांनी केले. प्रास्ताविकात अध्यक्ष चौगुले यांनी संस्थेच्या कार्याची माहिती विषद केली. यावेळी कुलगुरू मुळे यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महावीर चौगुले, संजय पाटील, निशिकांत गोरुले, विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेच्या गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, आजरा या शाखांतील अधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. माणिक घुमाई यांनी आभार मानले. डॉ. समिधा चौगुले यांच्या पसायदानाने सांगता झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Young people should be given priority for skill development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.