आपलं लक्ष आपल्या ध्येयाकडे असले पाहिजे- किरण लोहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:49 AM2019-11-29T11:49:03+5:302019-11-29T11:49:41+5:30
या रॅलीमध्ये संविधान घोषवाक्य फलक घेऊन सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. रॅलीच्या समारोपानंतर त्याचे कार्यक्रमात रूपांतर झाले.
कोल्हापूर - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे विभाग कोल्हापूर यांच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून दि. 26नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये संविधान साक्षर ग्राम हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे ता.करवीर याठिकाणी राबविण्यात येणार आहे .
त्याच्या अनुषंगाने 26 रोजी कन्या व कुमार विद्यामंदिर,देवी पार्वती ँ्रॅँ२ूँङ्मङ्म’ व ्न४ल्ली्रङ्म१ कॉलेज येथे संविधान साक्षर ग्राम उपक्रमाचे उद्घाटन संविधान दिंडीचे पूजन करून सरपंच सचिन चौगुले उपसरपंच दीपक व्हरगे ,ग्रामपंचायत सदस्य सयाजीराव घोरपडे,जिल्हा समन्वयक आशा रावण समतादुत किरण चौगुले सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांचे हस्ते करण्यात आली.
संविधान रॅली गावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल येथे पर्यंत काढण्यात आली यावेळी गटविकास अधिकारी सचिन घाटगे उपस्थित होते.या रॅलीमध्ये संविधान घोषवाक्य फलक घेऊन सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. रॅलीच्या समारोपानंतर त्याचे कार्यक्रमात रूपांतर झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वच महापुरुषांच्या फोटो ना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने झाली. यानंतर स्वागत गीत व प्रास्ताविका वाचन झाले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वडणगे गावचे सरपंच सचिन चौगुले उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मुलांना संविधानाविषयी मार्गदर्शन केले . त्यांनी आपल्या समोर अनेक प्रश्न असतात पण आपलं लक्ष आपल्या ध्येयाकडे असले पाहिजे हे सांगितले.प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सर्जेराव वडणगेकर यांनी सविधनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.यानंतर घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस धुमाळ सर यांनी केले. प्रास्तविक समतदूत आशा रावण तर आभार समतादूत प्रतिभा सावंत यांनी मानले.या कार्यक्रमास सर्जेराव घोरपडे सर्व ग्रामपंचायत सदस्य आशा वर्कर, ग्रामस्थ युवक युवती विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम बार्टीचे महासंचालक कैलास कणसे प्रकल्प मुख्य संचालिका प्रज्ञा वाघमारे ,विभागीय प्रकल्प अधिकारी जागृती गायकवाड, गणेश सवाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा रावण ,समतादुत किरण चौगुले समतादुत प्रतिभा सावंत यांनी नियोजन केले.