शाहूपुरीतील घरफोडीप्रकरणी तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:33+5:302021-06-23T04:17:33+5:30

कोल्हापूर : बनावट चावीचा वापर करून शाहूपुरीत सुमारे दीड लाखाची घरफोडी करून रोकड लांबवणा-या सराईत चोरट्यास शाहुपूरी पोलिसांनी शिताफीने ...

Youth arrested in Shahupuri burglary case | शाहूपुरीतील घरफोडीप्रकरणी तरुणास अटक

शाहूपुरीतील घरफोडीप्रकरणी तरुणास अटक

Next

कोल्हापूर : बनावट चावीचा वापर करून शाहूपुरीत सुमारे दीड लाखाची घरफोडी करून रोकड लांबवणा-या सराईत चोरट्यास शाहुपूरी पोलिसांनी शिताफीने अटक केली. दिग्विजय अनिल जाधव (वय २३, रा. डोंगळे अपार्टमेंट शेजारी, उत्तरेश्वर पेठ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून घरफोडीतील दीड लाख रुपयापैकी १ लाख ३२ हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १३ जून रोजी सायंकाळी सुधीर धोंडीराम कीर्तने (वय ७७, रा. शाहुपूरी पहिली गल्ली, कोल्हापूर) हे फिरण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप बनावट चावीने काढून आतील सुमारे दीड लाखाची रोकड लंपास केली होती. त्याची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे. किर्तणे हे त्या इमारतीतील फ्लॅटमध्ये एकटेच राहत असल्याने ही घरफोडी माहितीगारांकडूनच केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, शाहुपूरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस सागर याला गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार दिग्विजय जाधव याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने घरफोडीतील घरात लपवून ठेवलेले चोरीतील १ लाख ३२ हजाराची रोकड काढून दिली. पोलिसांनी ती जप्त केली. ही कारवाई शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. परशुराम कोरके, पोलीस धमेंद्र बगाडे, शुभम संकपाळ, जगदीश बामणीकर यांनी केली.

पाळत ठेवून केली होती घरफोडी

अटक केलेला दिग्विजय जाधव हा तक्रारदार कीर्तने यांच्याच इमारतीत तळमजल्यातील हॉस्पिटलमधील कर्मचारी आहे, कीर्तने हे एकटेच राहत असून त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याचे त्याला माहिती होते. सायंकाळी ते फिरण्यासाठी बाहरे पडल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप बनावट चावीने कुलूप काढून त्याने घरफोडी केल्याचे उघड झाले.

फोटो नं. २२०६२०२१-कोल-दिग्विजय जाधव (आरोपी-शाहुपूरी)

फोटो नं. २२०६२०२१-कोल-कॅश (शाहुपूरी)

ओळ : अटकेतील संशयित दिग्विजय जाधवने आपल्या घरात लपवून ठेवलेली रोकड पोलिसांनी हस्तगत केली.

===Photopath===

220621\22kol_8_22062021_5.jpg

===Caption===

फोटो नं. २२०६२०२१-कोल-दिग्वीजय जाधव (आरोपी-शाहुपूरी)फोटो नं. २२०६२०२१-कोल-कॅश (शाहुपूरी)ओळ : अटकेतील संशयीत दिग्वीजय जाधवने आपल्या घरात लपवून ठेवलेली रोकड पोलिसांनी हस्तगत केली.

Web Title: Youth arrested in Shahupuri burglary case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.