युथ बँकेला पुन्हा ‘चेतना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:24 AM2021-04-07T04:24:07+5:302021-04-07T04:24:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रिझर्व्ह बँकेच्या ३५ (ए)च्या कारवाईनंतर सहकारी बँका बाहेर येत नाहीत. मात्र कोणतीही भीडभाड न ...

Youth Bank revived | युथ बँकेला पुन्हा ‘चेतना’

युथ बँकेला पुन्हा ‘चेतना’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : रिझर्व्ह बँकेच्या ३५ (ए)च्या कारवाईनंतर सहकारी बँका बाहेर येत नाहीत. मात्र कोणतीही भीडभाड न ठेवता, थकबाकीदारांच्या अडचणी समजावून घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन योग्य पध्दतीने वसुली मोहीम राबविल्यानंतर या कारवाईतूनही बँका बाहेर येऊ शकतात, हे युथ डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून चेतन अरुण नरके यांनी दाखवून दिले आहे. महापूर, कोरोनासह विविध संकटांवर मात करत अवघ्या दोन वर्षात बँकेला पूर्वपदावर आणून राज्यातील सहकारासमोर त्यांनी आदर्श ठेवला आहे.

थकीत कर्जाची वसुली थकल्याने बँकेचे नेटवर्थ उणे ८ कोटी झाल्याने रिझर्व्ह बँकेने युथ बँकेवर निर्बंध आणले होते. १७ कोटीची कर्जे थकीत होती. त्यातील काही अल्पतारण असल्याने वसुलीचे आव्हान होते. मात्र हे शिवधनुष्य चेतन नरके यांची उचलले. दोन वर्षे वसुलीचे काम अगदी नियोजनबध्दरित्या केले आणि त्यानुसार वसुली मोहीम राबविल्याने बँक पूर्वपदावर येऊ शकली. टप्प्या-टप्प्याने बँकेचे कामकाज सुरू होणार आहे.

व्यक्तिगत नुकसान सहन करून बँक वाचविली

बँक अडचणीत आल्यानंतर ठेवीदार आक्रमक असतात. येथे मात्र, सगळ्यांना विश्वास दिल्याने असे प्रकार झाले नाहीत. तरीही सहकारात ‘नरके ब्रॅण्ड’वर सामान्य लोकांचा विश्वास आहे, तो जपण्यासाठी चेतन नरके यांनी सकाळी आठ ते रात्री आठ बँकेत ठाण मांडून काम केले. त्यांनी मुंबईसह आपली इतर कार्यालये बंद करून केवळ युथ बँक म्हणून जोरदार काम केले.

रिझर्व्ह बँकेकडून चेतन यांचे कौतुक

युथ बँक वाचविण्यासाठी चेतन नरके यांची धडपड पाहून रिझर्व्ह बँकेनेही मदत करण्याचे धोरण घेतले. रिझर्व्ह बँकेच्या ‘सीजीएम’ उमा शंकर यांनी, ‘चेतन’च्या रूपाने महाराष्ट्राला नवा अर्थतज्ञ मिळाला, असे कौतुक करत महाराष्ट्रातील अडचणीतील बँकांना सल्ला देण्याची जबाबदारी सोपवली.

दृष्टिक्षेपात युथ बँक, मार्च २०२१

शाखा- १३

भागभांडवल- ६.५२ कोटी

ठेवी- ७४.३३ कोटी

कर्जे- १३ कोटी

गुंतवणूक- ६९ कोटी

ढोबळ नफा- ६.६८ कोटी

सीआरएआर- १३ टक्के

बँक बाहेर काढण्यासाठी हे केले...

भागभांडवलात दोन कोटी वाढ

कायदेशीर बाबींची पूर्तता करून तारण मालमत्तांची विक्री

उत्पन्न वाढीकडे लक्ष

व्यवस्थापन खर्चात कपात

संचालक मंडळ सभा भत्ता बंद

वसुली व दैनंदिन कामकाजावर पूर्ण लक्ष

कोट-

ठेेवीदारांचा अरुण नरके यांच्यावरील असलेला विश्वास, कर्जदारांनी दिलेली साथ व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर बँक पूर्वपदावर आणू शकलो. त्रास झाला असला तरी, एक बँक वाचवू शकलो, याचा आनंद त्यापेक्षा अधिक आहे. आगामी काळात अत्याधुनिक व ग्राहकाभिमुख सेवा देऊ.

- चेतन नरके (तज्ञ संचालक, युथ बँक)

Web Title: Youth Bank revived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.