‘काल रात्री लय ताटत होतास’; कोल्हापुरात तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण

By सचिन भोसले | Published: September 23, 2023 06:28 PM2023-09-23T18:28:31+5:302023-09-23T18:28:54+5:30

कोल्हापूर : ‘काल रात्री लय ताटत होतास ‘ असे म्हणत एका तरूणास चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व धारदार शस्त्राने ...

Youth beaten with kicks in Kolhapur, A case has been registered against four | ‘काल रात्री लय ताटत होतास’; कोल्हापुरात तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण

‘काल रात्री लय ताटत होतास’; कोल्हापुरात तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण

googlenewsNext

कोल्हापूर : ‘काल रात्री लय ताटत होतास ‘ असे म्हणत एका तरूणास चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद निखील उत्तम कोराणे (वय ३०, रा.साई टाॅवर, शिवाजी पेठ) याने शुक्रवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. त्यानूसार संशयित सुशिल लोहार, सुभम चौगले, चेतन पोवार (रा. वेताळमाळ तालीम शेजारी, शिवाजी पेठ ) व अन्य एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा नोंदविला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेताळमाळ परिसरात फिर्यादी निखील हा शुक्रवारी काका विश्वनाथ विलासराव कोराणे यांच्या घरी जेवण करण्यासाठी गेला होता. त्यांच्या घरात घुसून संशयितांनी फिर्यादीस काॅलरला पकडत घरातून बाहेर काढून काल रात्री लय ताटत होतास असे म्हणून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली. यादरम्यान संशयित शुभम व चेतन यांनी कमरेला चाकुसारखे धारदार शस्त्र काढून वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार फिर्यादने चुकविला. 

तेवढ्यात फिर्यादीचे काका विश्वनाथ व काकी वैजयंती यांच्यासह वेताळ तालीम मांडवात बसलेला मित्र स्वप्निल टिटवेकर, पार्थ पाटील पळत आले. त्यांनी संशयित सुशिल यांच्याकडील चाकुसाऱखे धारदार शस्त्र काढून घेतले. म्हणून संशयित चेतन ने त्याच्याकडील गुप्तीसारखे हत्यार बाहेर काढून जमलेल्या सर्वांना ते दाखवून हवेत फिरवत हे सर्वजण पळून गेले. असे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनूसार पोलिसांनी संशयित तिघांसह अन्य एका अनोळखी युवकाविरोधात गुन्हा नोंदविला.

Web Title: Youth beaten with kicks in Kolhapur, A case has been registered against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.