तरुणांनी गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:04+5:302021-04-01T04:25:04+5:30

दौलतवाडी ता. कागल येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी अश्विनी हिंदुराव भराडे हिची खडतर स्पर्धा ...

The youth should try to increase the reputation of the village | तरुणांनी गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावा

तरुणांनी गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावा

Next

दौलतवाडी ता. कागल येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी अश्विनी हिंदुराव भराडे हिची खडतर स्पर्धा परीक्षेतून बीएसएफमध्ये निवड झाली. गावातील पहिलीच मुलगी अशी स्पर्धा परीक्षेतून निवड झाल्यामुळे गावाने तिचा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे आणि मंडलिक महाविद्यालय मुरगूडचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक सत्काराचा कार्यक्रम केला.

वीरेंद्रसिंह भोसले युवा मंचने यात पुढाकार घेतला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच श्रीकांतराव भोसले (सरकार) होते.

प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, सपोनि. विकास बडवे, वीरेंद्र भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कोरोना योद्धे शिवाजी कुंभार, संजय कुदळे, सुनील जाधव, दीपा बेलेकर, अश्विनी जाधव, कविता कांबळे, शेवंता अस्वले, मनीषा जाधव, अनघा सावगावे, अश्विनी आसवले, ज्योती अस्वले, विलास कांबळे, आनंदा अस्वले, सागर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच विठ्ठल जाधव, मंडलाधिकारी सारिका भाट, अमोल मोरे, मुख्याध्यापक शिवाजी कुंभार, ग्रामसेविका अनघा सावगावे, पोलीस पाटील अश्विनी अस्वले आदी उपस्थित होते. वीरेंद्रसिंह भोसले यांनी स्वागत, प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी कुंभार, सूत्रसंचालन संजय कुदळे यांनी केले. बाळासो जाधव यांनी आभार मानले.

फोटो ओळ

दौलतवाडी ता. कागल येथे स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या अश्विनी भराडे यांचा सत्कार करताना तहसीलदार शिल्पा ठोकडे, सोबत श्रीकांत भोसले,अर्जुन कुंभार आदी.

Web Title: The youth should try to increase the reputation of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.