उजळाईवाडीच्या स्मशानभूमीचा युवकांनी केला कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:06+5:302021-01-09T04:19:06+5:30
युवकांनी केलेल्या आवाहनानंतर नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने या स्मशानभूमीचा कायापालट करण्यात आला आहे. लोकवर्गणी गोळा करून स्मशानभूमीची ...
युवकांनी केलेल्या आवाहनानंतर नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने या स्मशानभूमीचा कायापालट करण्यात आला आहे. लोकवर्गणी गोळा करून स्मशानभूमीची रंगरंगोटी, घोष्यवाक्य, बसण्यासाठी बाकडी, वृक्षारोपण, झाडांना संरक्षक कुंपण, कमानीला गेट करून स्मशानभूमी बदलून टाकली आहे. ग्रामसेवक दत्तात्रय धनगर, प्रशांत जोशी, अवधूत पाटील, प्रशांत माने, आनंद मोरे, रवींद्र सुतार, विशाल पोवार, श्रीकांत पाटील, अमृत माने, सुनील माने, शिवाजी माने, नारायण रजपूत या युवकांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनीही साथ दिल्याने स्मशानभूमीचे काम तडीस गेले आहे.
चौकट :
ही झाली कामे : स्मशानभूमीत पावसाळ्यात होणारी दलदल लक्षात घेऊन पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. पाण्याची टाकी बांधण्यात आली. स्मशानभूमीत बागबगीचा फुलविण्याचा मानस आहे. त्याचबरोबर अंघोळ करण्यासाठी शॉवर उभारण्यात येणार आहे.
कोट :
गावातील मृतांवर अनेक वर्षांपासून या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतात. पण स्मशानभूमीची गैरसोय झाल्याने युवकांनी ग्रामस्थांना मदतीचे आवाहन करीत या स्मशानभूमीचे रुपडे पालटले आहे.
- दत्तात्रय धनगर, ग्रामसेवक
फोटो ०८ उजळाईवाडी स्मशानभूमी
ओळ:
उजळाईवाडीच्या वैकुंठभूमी स्मशानभूमीचा लोकसहभागातून कायापालट झाला आहे. स्मशानभूमीची दर्शनी कमान लक्ष वेधून घेत आहे.