मराठा मूक आंदोलनाला आजऱ्यातील गावागावांतून युवक जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:32+5:302021-06-16T04:32:32+5:30
आजरा तालुका मराठा महासंघातर्फे प्रत्येक गावागावांत जाऊन मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे, याबाबत प्रबोधन करून जनजागृती ...
आजरा तालुका मराठा महासंघातर्फे प्रत्येक गावागावांत जाऊन मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे, याबाबत प्रबोधन करून जनजागृती केली जात आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण सध्या सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे मराठा तरुणांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनला कोल्हापूर येथील शाहू समाधिस्थळी मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आजरा तालुक्यातील गावागावांतील तरुणांनी स्वत: नाष्टा, पाणी, मास्क व छत्री घेऊन कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, आजरा तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, उपाध्यक्ष बंडोपंत कातकर, कार्याध्यक्ष संभाजीराव इंजल, सरचिटणीस प्रकाश देसाई यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते गावागावांतील सकल मराठा समाजातील तरुणांची भेट घेऊन त्यांना मूक आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करीत आहेत.
तालुक्यातील सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते कोल्हापूर येथे सकाळी ठीक १० वाजता शाहू समाधिस्थळी पोहोचणार आहेत, अशीही माहिती तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी दिली.