युसूफ पीरजादे, दीपक पोवार यांची बाजी

By admin | Published: January 29, 2016 12:22 AM2016-01-29T00:22:07+5:302016-01-29T00:27:43+5:30

राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा : निवृत्ती चौक रिक्षा मंडळातर्फे आयोजन

Yusuf Pirzade, Deepak Powar's bet | युसूफ पीरजादे, दीपक पोवार यांची बाजी

युसूफ पीरजादे, दीपक पोवार यांची बाजी

Next

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धेत नवीन गटात युसूफ पीरजादे (बेळगाव), तर जुन्या गटात दीपक मोरे (कोल्हापूर) यांनी प्रथम क्रमांक मिळवीत बाजी मारली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही निवृत्ती चौक, शिवाजी पेठ येथे आयोजित केलेल्या या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत कोल्हापूरसह सातारा, पुणे, बेळगाव, बार्शी, सांगली, मिरज, आदी ठिकाणांहून रिक्षाचालकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : नवीन गट - युसूफ पीरजादे (बेळगाव) प्रथम; तर इम्रान खलिफा, अनिकेत पोवार (दोघेही कोल्हापूर) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. उत्तेजनार्थ इस्माईल मिर्जा (मिरज) यांना, तर जुन्या गटात दीपक पोवार (कोल्हापूर), अनुप पायगुडे (पुणे), मुस्ताक पेंटर (सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवीत बाजी मारली. या गटात उत्तेजनार्थ सिद्धार्थ कांबळे (कोल्हापूर) यांना गौरविण्यात आले.
ही स्पर्धा गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे घेतली जाते. यंदा शीतल माळकर, अर्जुन दावणे या रिक्षाचालकांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अ‍ॅड. संपतराव पवार, विजय पाटील, नीलेश कदम, किरण पडवळ, चंद्रकांत भोसले, संयोजक राजू जाधव आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण विलास गवळी, मनोज दरे, भालचंद्र काणे यांनी केले. यावेळी दोन चाकांवर व रिव्हर्स रिक्षा चालविण्याची प्रात्यक्षिके संतोष जाधव(सांगली) यांनी करून दाखविली.
स्पर्धेसाठी सतीश पाटील, सुनील मगदूम, उदय देशमाने, सचिन पोवार, गणेश कुलकर्णी, राजू कापूसकर, वसंत पाटील, देवराज पाटील, संजय माळी, शानाप्पा जावळे, गणेश पोतदार, सुनील गुरव, भरत पाटील, श्रीकांत चिले, शेखर जाधव, आदींनी परिश्रम केले. (प्रतिनिधी)

Web Title: Yusuf Pirzade, Deepak Powar's bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.