‘लोकमत एज्युकेशन फेअर’मधून उलगडणार ‘युवावाटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:55 AM2019-06-05T00:55:25+5:302019-06-05T00:55:30+5:30
कोल्हापूर : युवा पिढीला यशस्वी आयुष्य आणि करिअरविषयक योग्य वाट दाखविण्यासाठी ‘लोकमत’ने एज्युकेशन फेअर आयोजित केली आहे. त्यातून करिअरबाबतच्या ...
कोल्हापूर : युवा पिढीला यशस्वी आयुष्य आणि करिअरविषयक योग्य वाट दाखविण्यासाठी ‘लोकमत’ने एज्युकेशन फेअर आयोजित केली आहे. त्यातून करिअरबाबतच्या युवावाटा उलगडणार आहेत. विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी आणि शैक्षणिक संस्थांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना या शैक्षणिक प्रदर्शनातून एकाच छताखाली मिळणार आहे. कोल्हापुरात शनिवार (दि. ८) ते सोमवार (दि. १०)पर्यंत हे प्रदर्शन होणार आहे.
येथील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे होणाऱ्या या प्रदर्शनास ‘द युनिक अकॅडमी, पुणे’चे प्रायोजकत्व, तर अॅमिटी युनिव्हर्सिटीचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. बँकिंग पार्टनर म्हणून ‘एसबीआय’ आहे. प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे टेराकोटा याचे प्रात्यक्षिक व माहिती दिली जाणार आहे. आपण या प्रदर्शनात अॅमिटी युनिव्हर्सिटी (जयपूर), संदीप युनिव्हर्सिटी, के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी (नाशिक), गार्डनसिटी युनिव्हर्सिटी (बंगलोर), अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, इंदिरा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (पुणे) अशा नामवंत युनिव्हर्सिटीज व संस्था सहभागी होणार आहेत. लाखो विद्यार्थी आणि पालकांपर्यंत आपले अभ्यासक्रम, संस्थेची माहिती देण्याची सुवर्णसंधी नामांकित शैक्षणिक संस्थांना एकाच छताखाली या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होत आहे.
प्रदर्शनात सहभागी शैक्षणिक संस्थांना विद्यार्थी, पालक यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून, आपल्या संस्थेबाबतची माहिती देता येईल. करिअरविषयक अनेक प्रश्नांसाठी अचूक उत्तर असणारे हे शैक्षणिक प्रदर्शन कोल्हापूरात होणार आहे. गेली अनेक वर्षे कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअर आणि शिक्षणाच्या अनेक शंका, प्रश्न असतात. या प्रदर्शनात त्यांचे निराकरण आणि त्यांच्या अनेक प्रश्नांना अचूक उत्तरे मिळतील. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ, आणि पैसा वाचणार आहे. या प्रदर्शनात शैक्षणिक संस्थांच्या माहितीसह मुलांच्या व्यक्तिमत्त्व कौशल्याचा विकास, बुद्धिमत्ता विकासाला चालना देण्यासाठी सायन्स पंडित, एज्युकेशन आयडॉल स्पर्र्धा होणार आहेत. त्यामध्ये हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन आणि चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.
तीनदिवसीय
कार्यक्रमांची रूपरेषा
शनिवारी (दि. ८)
दुपारी ४ वाजता : इम्पॉर्टन्स आॅफ इंग्लिश (मार्गदर्शक : राजीव नाईक)
सायंकाळी ५ वाजता : करिअर : एक चिंतन (मार्गदर्शक : चारूदत्त रणदिवे)
सायंकाळी ६ वाजता : रोबोटेक वर्कशॉप (मार्गदर्शक : सुधीर पाटील)