युवराज पाटील यांची सुनावणी १ जूनला

By admin | Published: May 22, 2017 05:22 PM2017-05-22T17:22:28+5:302017-05-22T17:22:28+5:30

शेतकरी संघ संचालक : भूविकास बॅँक थकबाकी प्रकरण

Yuvraj Patil's hearing on June 1 | युवराज पाटील यांची सुनावणी १ जूनला

युवराज पाटील यांची सुनावणी १ जूनला

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २२ : शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्यासह तीन संचालकांच्या अपात्रतेबाबत १ जून रोजी सुनावणी होणार आहे. जिल्हा उपनिबंधक सोमवारी उपस्थित नसल्याने याबाबतची सुनावणी होऊ शकली नाही. भूविकास बॅँकेच्या थकबाकीबाबत संघाचे माजी संचालक सुरेश देसाई यांनी तक्रार दाखल केली आहे.

शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी भूविकास बॅँकेच्या कागल शाखेतून पाईपलाईन व वीजपंप खरेदीसाठी २७ मार्च २०१२ ला १५ लाखांचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज त्यांच्यासह त्यांचे सूपूत्र मानसिंग पाटील यांच्या नावावर थकीत असून २० लाख ८३ हजार ९१९ रूपयांपर्यत थकबाकी गेली आहे. मानसिंग पाटील (तारळे , ता. राधानगरी) यांनी १९ जून २०१२ ला म्हैस खरेदीसाठी राधानगरी शाखेतून १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले त्यातील १ लाख ६२ हजार ३५१ रुपये कर्ज थकित आहे.

मारुती पाटील (दिगवडे, ता. पन्हाळा) यांनी म्हैस खरेदीसाठी बँकेच्या कळे शाखेतून ३० मार्च २०१२ ला एक लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले, त्यातील ६५ हजार ३८ रुपये थकित आहेत. याविरोधात सुरेश देसाई यांनी जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांच्याकडे तक्रार केली आहे. सहकार संस्था कलम ७३ (सी. ए) अन्वये संचालक पद रद्द का करू नये, अशी नोटीसा जिल्हा उपनिबंधकांनी लागू केल्या असून यावर सोमवारी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते.

तीन संचालकांच्या वतीने सोमवारी अ‍ॅड. दत्ता राणे उपस्थित राहिले. पण जिल्हा उपनिबंधक काकडे हे आयुक्तांच्या बैठकीसाठी पुण्याला गेल्याने सुनावणी झाली नाही. पण अ‍ॅड. राणे यांनी तक्रारीची नक्कल सहकार विभागाकडे मागितली आहे. पुढील सुनावणी १ जून रोजी होणार आहे.

थर्ड पार्टीसाठी देसार्इंचा अर्ज

या प्रकरणात आपण तक्रारदार असून याबाबतची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. त्यामुळे सुनावणी वेळी थर्ड पार्टी म्हणून आपणालाही नोटीस काढावी, अशी मागणी सुरेश देसाई यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

शिक्षक बॅँकेची सोमवारी सुनावणी

प्राथमिक शिक्षक बॅँक नुकसान प्रकरणी आजी-माजी संचालकांना नोटीसा लागू केल्या आहेत. यावर सोमवारी (दि. २९) म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Yuvraj Patil's hearing on June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.