झंवर यांचे उद्योगविश्वासह समाजासाठी मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:30+5:302021-06-25T04:17:30+5:30
शिरोली : रामप्रताप झंवर यांचे उद्योग विश्व व समाजासाठी केलेले योगदान मोठे आहे, या शब्दांत आमदार चंद्रकांत जाधव ...
शिरोली : रामप्रताप झंवर यांचे उद्योग विश्व व समाजासाठी केलेले योगदान मोठे आहे, या शब्दांत आमदार चंद्रकांत जाधव यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅक येथे ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांच्या शोकसभेचे आयोजन केले होेते. यावेळी जाधव बोलत होते. रामप्रताप झंवर यांच्या छायाचित्रांची चित्रफीत प्रदर्शित करून कवी के. सुरेश यांनी त्यांच्या जीवनप्रवासाविषयी लिहिलेल्या कवितेचे वाचन करण्यात आले. यावेळी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅक, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मेन, मिशन संवेदना अंतर्गत शिरोली पोलीस ठाणे व रोटरी क्लब ऑफ होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, शिवाजीराव
पवार, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे मोहन पंडितराव, नितीनचंद्र दळवाई, उदय दुधाणे, समीर पाटील, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मेनचे अध्यक्ष अरविंद कृष्णन, करवीर पोलीस उपाधीक्षक आर. आर. पाटील, चंद्रशेखर डोली, रवीकुमार केलीगीनमठ, जयदीप चौगले, एम. वाय.पाटील, राजू पाटील, सचिन पाटील, अमर जाधव, सुरेंद्र जैन, दीपक परांडेकर, श्यामसुंदर तोतला, प्रशांत
शेळके, भरत जाधव, रवी डोली, भीमराव खाडे, राजू पाटील, सुरेंद्र जैन, सचिन पाटील, श्यामसुंदर तोतला उपस्थित होते. कुटुंबीयांकडून झंवर यांचे नातू नीरज झंवर यांनी आभार मानले.
फोटो : २४ झंवर शोकसभा
उद्योजक रामप्रताप झंवर यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी आमदार चंद्रकांत जाधव, शेजारी अतुल पाटील, आर. आर. पाटील, किरण भोसले, जयदीप चौगले उपस्थित होते.