‘झेप’मध्ये तरुणाईला होणार मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:51+5:302021-06-24T04:16:51+5:30
या कार्यक्रमात शुक्रवारी ‘व्ही स्क्वेअर सिस्टिम्स’चे सीईओ अजेय देशमुख यांची मुलाखत ही मस्कत (ओमन) येथील मनीष उद्धव घेणार ...
या कार्यक्रमात शुक्रवारी ‘व्ही स्क्वेअर सिस्टिम्स’चे सीईओ अजेय देशमुख यांची मुलाखत ही मस्कत (ओमन) येथील मनीष उद्धव घेणार आहेत. शनिवारी अमेरिकेतील मेडिस्पेंड कंपनीचे संचालक व्ही. बालचंद्रन, निवेदिका वसुंधरा काशीकर-भागवत (संवाद आणि मुलाखत कौशल्ये, कशी आत्मसात करावी) मार्गदर्शन करतील. सोमवारी मुंबईतील आयआयटीचे प्रा. डॉ. पराग भार्गव (उच्च हेतू हाच अंत:प्रेरणेचा स्रोत कसा होतो), मंगळवारी (२९) प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी (कोविडनंतरच्या जगात तरुणांसाठी आव्हाने आणि संधी) आणि बुधवारी मानसोपचार शाखेतील डॉ. अविनाश जोशी (जॉब आणि करिअर हे द्वंद्व कसे हाताळावे), तर दि.१ जुलैच्या समारोपीय सत्रात ‘गुगल’चे प्रमुख अकाउंट मॅनेजर नीरज हुद्दार (एमबीए करावे की नाही, हा निर्णय कसा घ्यावा) मार्गदर्शन करणार आहेत. पत्रभेट सदस्यांसाठी हा कार्यक्रम निशुल्क आहे.