पेयजलाच्या प्रश्नासाठी झेडपीत महिला धडकल्या

By Admin | Published: March 18, 2017 12:14 AM2017-03-18T00:14:57+5:302017-03-18T00:14:57+5:30

तालुक्यातील रेवसा येथे विश्रोळी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र गावातच मुबलक पाण्याचे स्त्रोत असल्याने वाढीव किमतीचे पाणी नागरिकांना परवडणारे नाही.

ZEDP women were beaten for drinking water question | पेयजलाच्या प्रश्नासाठी झेडपीत महिला धडकल्या

पेयजलाच्या प्रश्नासाठी झेडपीत महिला धडकल्या

googlenewsNext

कोल्हापूर : उन्हाचा चढत चाललेला पारा, त्यासोबतीला रंगांची उधळण करीत न्हाऊन निघालेली तरुणाई व आबालवृद्ध अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी कोरडी, पर्यावरणपूरक रंगपंचमी शहरासह जिल्ह्यात साजरी झाली. बहुतांश युवावर्गाने नैसर्गिक रंगांचा वापर केला. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी, जुना बुधवार पेठ, आदी ठिकाणी पारंपरिक पद्धतीने जल्लोष दिसला. रंगोत्सवाच्या शुभेच्छा संदेशांनी सोशल मीडियाही रंगून गेला होता.
शहरातील प्रत्येक भागामध्ये शुक्रवारी रंगपंचमीनिमित्त अपूर्व उत्साह होता. पाण्याची टंचाई लक्षात घेता यंदाची रंगपंचमी पाण्याविनाच साजरी करण्याचा निर्णय नागरिकांनी व युवावर्गाने घेतला होता. त्यामुळे यावर्र्षी कोरड्या रंगांनी पर्यावरणपूरक रंगपंचमी खेळण्यावर भर दिला गेला. सकाळपासूनच शहरातील प्रमुख भागांमध्ये रंगांच्या उधळणीला सरुवात झाली. लाल, पिवळ्या, भगव्या, गुलाबी, हिरव्या अशा रंगांत आपल्या मित्राला यथेच्छ भिजविण्याचा आनंद बालचमूंकडून घेतला जात होता. या बालचमूंच्या रंगोत्सवात दुपारपर्यंत तरुणाई व आबालवृद्ध मंडळीही सामील झाली. सार्वजनिक मंडळांकडून दरवर्षी चौकाचौकांत घुमणारा डॉल्बीचा दणदणाट यंदा कोठेही कानी पडला नाही. त्यापेक्षा अनेक तरुणांनी दुचाकीवरून मित्रमंडळींच्या घरात जाऊन त्यांना रंगविण्याचा आनंद लुटला. दुपारनंतर महिला व तरुणीही रंगपंचमीचा आनंद लुटण्यास कंबर कसून पुढे आल्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थिनी दुचाकीवरून जाऊन मैत्रिणींना रंगवत होत्या. एकूणच दिवसभर शहरामध्ये रंगोत्सवाची धूम पाहावयास मिळाली.
नका वापरू पाणी,
खेळा कोरडीच रंगपंचमी
अनेक युवक-युवतींनी सकाळपासूनच हातात बोर्ड घेऊन मोटारसायकलवरून शहराच्या प्रमुख भागांत फेरी मारत ‘नका वापरू पाणी, खेळा कोरडीच रंगपंचमी’ व नैसर्गिक रंगांचाच वापर करा, असा संदेश दिला. असे एक ना अनेक जथ्थे शहराच्या विविध भागांत ‘पाणी वाचवा व नैसर्गिक रंगांचाच वापर करा,’ असे संदेश देत फेरी मारत होते.
विविध संघटनांतर्फे रंगोत्सव साजरा
भागीरथी महिला संस्था, मुक्ता मंच, रोटरी इनरव्हील क्लब, जितो, आदींतर्फे नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये महिलांसाठी रंगोत्सवाचे आयोजन केले होते. सकाळी आठपासून सुरू झालेला हा उत्सव दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होता. यात हजारो महिलांनी सहभाग घेत कोरड्या व नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
रंगण्यापेक्षा सहलीचे नियोजन
बहुतांश मंडळांंच्या कार्यकर्त्यांनी शहरानजीकच्या पर्यटन स्थळांवर जाऊन सामुदायिक सहलीचा आनंद लुटत रंगपंचमी साजरी केली. राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा अशा पर्यटनस्थळांना भेटी देऊन उन्हाळी पर्यटन करीत अनेक तरुण मंडळांच्या ग्रुपनी रंगोत्सवाच्या वेगळ्या रंगांचे दर्शन घडविले.
पेठांतील तालमीही रंगल्या
कोणताही सण-उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करणाऱ्या शहरातील विविध पेठांमध्ये शुक्रवारी रंगपंचमीचा उत्साहही वाखाणण्यासारखा होता. सकाळी नऊ वाजल्यापासून शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठांमधील रस्त्यांवर विविध रंगांचा सडा पडला होता. बालचमूंपासून ते तालीम मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रत्येकजण या रंगाच्या उत्सवात सामील झाले होते. पेठांमधील प्रमुख तालमींच्या आवारात दिवसभर रंगपंचमी खेळली जात होती. लक्ष्मीपुरीत रंगपंचमीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले.
उद्या पर्यावरणपूरक रंगपंचमी
प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरतर्फे उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क येथे कोरड्या रंगांच्या पर्यावरणपूरक रंगपंचमीचे आयोजन केले आहे.


‘निसर्गमित्र’कडून नऊशे किलो रंगांची विक्री
गेल्या काही वर्षांपासून वनस्पतिजन्य रंग वापरावेत यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘निसर्गमित्र’च्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदा रंगपंचमीनिमित्त ‘निसर्गमित्र’ संस्थेकडून नऊशे किलो वनस्पतिजन्य रंगांची विक्री झाल्याचे अनिल चौगुले यांनी सांगितले.


मुलींचा सहभाग लक्षणीय
शहरात सकाळपासूनच एका दुचाकीवरून तीन-तीन मुली बसून आपल्या मैत्रिणींना व सुहृदांना रंगविण्यासाठी जातानाचे चित्र दिसत होते. विशेष म्हणजे दुचाकीवर तिबल सीट असूनही वाहतूक पोलिसांनी त्यांना अडविले नाही. हे चित्र सर्व सिग्नलवर दिसले. काही चौकांत मात्र पोलिसांनी दुचाकीवरून तिबल सीट जाणाऱ्या युवकांना अडवून कागदपत्रे तपासणी व कारवाईचा बडगा उगारला. यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस चौकाचौकांत तैनात करण्यात आले होते. मोठ्या पोलिस बंदोबस्तामुळे रंगपंचमी विनाअडथळा पार पडली.

इथे पाण्याचा मुक्त वापर
शहराच्या बहुतांश भागांमध्ये नैसर्गिक व कोरड्या रंगांच्या उधळणीत रंगपंचमी साजरी केली जात होती; तर राजारामपुरी बारावी गल्ली येथे मंडप घालून त्यामध्ये पाण्याचे शॉवर सोडण्यात आले होते.
अनेक तरुणांनी यात मुक्तपणे रंगांची उधळण केली आणि पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. यासह राजारामपुरीतील काही गल्ल्यांमध्ये पाण्याचा मुक्त वापर करीत रंगपंचमी साजरी करण्यात आली.

Web Title: ZEDP women were beaten for drinking water question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.