झिरो पेंडन्सीच्या धर्तीवर झिरो रुग्ण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:04+5:302021-05-27T04:25:04+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ४१ दिवसांनंतर सकारात्मक परिस्थिती येत असून, ‘झिरो पेंडन्सी’च्या धर्तीवर ‘झिरो रुग्ण’ ही ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ४१ दिवसांनंतर सकारात्मक परिस्थिती येत असून, ‘झिरो पेंडन्सी’च्या धर्तीवर ‘झिरो रुग्ण’ ही संकल्पना घेऊन प्रशासन काम करीत आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केले.
जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे, तसेच अन्य जिल्ह्यांतील रुग्णदेखील येथे येत असल्याने रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. मात्र, नागरिकांनी घाबरू नये. लक्षणे दिसताच वेळीच उपचार घ्यावेत. तपासणी आणि उपचारास उशीर करू नये. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अन्यथा पडू नये. कोरोनाचे स्प्रेडर होऊ नये. एकत्रित गर्दी करू नये.
--
म्युकरमायकोसिसबाबत जागृती करा
म्युकरमायकोसिसचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. सीपीआर रुग्णालयासह इतर रुग्णालयातही या आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यातील नेत्ररोग तज्ज्ञांनी या आजाराबद्दल नागरिकांमध्ये जागृती करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
---