जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक हालचाली सुरू, जाणून घ्या जिल्हावार वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 11:07 AM2022-02-05T11:07:40+5:302022-02-05T11:08:43+5:30

निवडणूक आयोगाने तपासणीसाठी दिलेले जिल्हावार वेळापत्रक

Zilla Parishad, Panchayat Samiti election activities started, drafting schedule announced | जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक हालचाली सुरू, जाणून घ्या जिल्हावार वेळापत्रक

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक हालचाली सुरू, जाणून घ्या जिल्हावार वेळापत्रक

googlenewsNext

कोल्हापूर : राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांची प्रारूप प्रभाग रचना तपासणीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केले. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची प्रशासकीय सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे लवकरच हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अ. गो. जाधव यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी पत्र पाठविले आहे. सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. १८, दि. ३१/०१/२०२२ मधील सुधारित तरतुदीनुसार या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची प्रारूप प्रभाग रचना सध्या जिल्हाधिकारी कार्यालय पातळीवर तयार करण्यात आली आहे.

हे सर्व कामकाज हाताळणारे उपजिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणीकरिता येत्या मंगळवारपासून म्हणजे ८ फेब्रुवारीपासून राज्य निवडणूक कार्यालयात दिलेल्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता उपस्थिती लावायची आहे.

त्यानुसार प्रभाग रचनेची हार्ड, तसेच सॉफ्ट कॉपी, नकाशे सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ३५ हजार मतदारसंख्येचा एक मतदारसंघ तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात मतदारसंघ वाढणार आहेत.

निवडणूक आयोगाने तपासणीसाठी दिलेले जिल्हावार वेळापत्रक

दिनांक                        जिल्हे

८ फेब्रुवारी २२             रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

९ फेब्रुवारी २२            नाशिक, जळगाव, अहमदनगर

१० फेब्रुवारी २२           पुणे, सातारा

११ फेब्रुवारी २२          कोल्हापूर, सांगली, सोलापूर

१२ फेब्रुवारी २२         औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर

१३ फेब्रुवारी २२         अमरावती, बुलडाणा, यवतमाळ

१४ फेब्रुवारी २२         चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली

Web Title: Zilla Parishad, Panchayat Samiti election activities started, drafting schedule announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.