जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:33 AM2021-02-26T04:33:31+5:302021-02-26T04:33:31+5:30
शिरोली : जिल्हा परिषदेच्या शाळेतच गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणातूनच आपली चमक दाखवावी, असे आवाहन हातकणंगले ...
शिरोली : जिल्हा परिषदेच्या शाळेतच गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणातूनच आपली चमक दाखवावी, असे आवाहन हातकणंगले पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी केले. शिरोली नंबर १ व नंबर ३ शाळेस पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयावर संवाद साधला. यावेळी केंद्रप्रमुख विजय दिवाण, कृष्णात पाटील, राजेश जाधव, संगीता भरमगोंडा, आशा हातकर, पावलस चौगुले, गोरखनाथ पाटील, रेश्मा वासकर, बाळासो आळतेकर, राखी कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो : २५ शिरोली प्रदीप पाटील
ओळी : शिरोली येथे हातकणंगले पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील यांचा सत्कार करताना राजेश जाधव. यावेळी केंद्रप्रमुख विजय दिवाण, कृष्णात पाटील, गोरखनाथ पाटील, रेश्मा वासकर उपस्थित होते.