गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यात जिल्हा परिषद शाळेचे मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:47+5:302021-06-24T04:16:47+5:30
कणेरी : गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे योगदान महत्त्वपूर्ण असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण गोष्टी शिकविणे गरजेचे आहे, ...
कणेरी : गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे योगदान महत्त्वपूर्ण असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण गोष्टी शिकविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव यांनी केले.
गोकूळ शिरगाव येथे करवीर पंचायत समिती यांच्या वतीने "शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम" या अभियानाची सुरुवात गोकूळ शिरगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी विश्वास सुतार, सरपंच महादेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यादव यांनी गाव, समाज, नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्या सहकार्याने शाळांचा विकास कसा साधता येईल याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बाजीराव पाटील, कुमार मोरे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एम. बी. पाटील, एम. जी. ननवरे, शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी उपस्थित होते.
फोटो
: २३ गोकुळ शिरगाव अभियान
गोकुळ शिरगाव येथे करवीर पंचायत समिती यांच्या वतीने "शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम" या अभियानाच्या प्रारंभाप्रसंगी करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव यांनी मार्गदर्शन केले.