शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळांचा डंका, कोल्हापुरातील बुशारा मुल्ला, विराज मोहिते राज्यात दुसरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 12:42 PM2023-07-14T12:42:32+5:302023-07-14T12:43:07+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्तेचा झेंडा फडकवण्याची परंपरा यावेळेलाही कायम राहिली

Zilla Parishad Schools Sting in Scholarship Examination, Bushara Mulla, Viraj Mohiteof Kolhapur second in state | शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळांचा डंका, कोल्हापुरातील बुशारा मुल्ला, विराज मोहिते राज्यात दुसरे

शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळांचा डंका, कोल्हापुरातील बुशारा मुल्ला, विराज मोहिते राज्यात दुसरे

googlenewsNext

कोल्हापूर : पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झाला असून पाचवी ग्रामीण विभागातून बुशारा शहनवाझ मुल्ला-वि. मं. सुलगाव, ता. आजरा आणि विराज राजे मोहिते-केंद्र शाळा गुडाळ, ता. राधानगरी यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. सक्षम शरद नारिंगकर-आनंदराव पाटील चुये इंग्लिश मीडियम स्कूल, अजिंक्य कागले-विद्यामंदिर कळे (ता. पन्हाळा) आणि राधिका पाटील-विद्यामंदिर मोहडे, चाफोडी यांनी राज्य गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला. शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्तेचा झेंडा फडकवण्याची परंपरा यावेळेलाही कायम राहिली.

पाचवी ग्रामीणच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ११० पैकी ३९ विद्यार्थी, तर शहरी गटातील यादीत १०२ पैकी ३३ विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. आठवीच्या ग्रामीण राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत १०६ पैकी २३ विद्यार्थी, तर शहरी गुणवत्ता यादीत ११० पैकी फक्त ९ विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. पाचवीचा राज्याचा निकाल २२ टक्के लागला असून कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ४० टक्के लागला आहे, तर आठवीचा राज्यात निकाल १५ टक्के लागला असून कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल २९ टक्के लागला आहे.

महापालिकेच्या जरग शाळेचा शिष्यवृत्तीत झेंडा

महापालिकेच्या लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरमधील शौर्य पाटील व अनन्या पोवार हे महाराष्ट्र राज्य पूर्वप्राथमिक (इयत्ता पाचवी स्तर) शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरे आले. या शाळेच्या १६ विद्यार्थ्यांनी परीक्षेत बाजी मारत राज्यातील महापालिकेच्या शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत दबादबा कायम ठेवला.

सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये यंदाही जरग शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले. या परीक्षेत महापालिकेच्या तीन शाळांतील एकूण २१ विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत समावेश झाला.

त्यांची नावे अशी : शर्वरी पाटील, अर्णव भोसले, अथर्व वाडकर, काव्या महाजन, प्रणव आरभावे, सिद्धी पाटील, प्रतीक्षा फाळके, सिद्धेश काळे, सोहम पाटील, सिद्धी अडसुळे, देवस्वा पाटील, श्रीराज चवहाण, चंदन काटवे, आर्या चराटे (लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर, कोल्हापूर), वसुधरा सावंत, सोनाक्षी गावडे, ज्ञानेश्वरी साळोखे (टेंबलाईवाडी विद्यामंदिर, कोल्हापूर), शौर्या मोरे (नेहरूनगर वसाहत विद्यालय, कोल्हापूर), अर्णव पाटील ( प्रिन्स शिवाजी जाधववाडी विद्यालय, कोल्हापूर).

Web Title: Zilla Parishad Schools Sting in Scholarship Examination, Bushara Mulla, Viraj Mohiteof Kolhapur second in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.