जिल्हा परिषदेतील आज, उद्याची बदली प्रक्रिया स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:37 AM2020-07-23T11:37:15+5:302020-07-23T11:37:59+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आज, गुरुवार आणि उद्या, शुक्रवार या दोन दिवशी होणारी मुख्यालयातील समुपदेशन बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी ही माहिती दिली.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये आज, गुरुवार आणि उद्या, शुक्रवार या दोन दिवशी होणारी मुख्यालयातील समुपदेशन बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी ही माहिती दिली.
पूर्वनियोजनानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील सर्व संवर्गातील वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या २३ व २४ जुलै रोजी करण्यात येणार होत्या. तसेच तालुकास्तरावर ३० व ३१ जुलै रोजी ही प्रक्रिया राबवण्यात येणार होती. मात्र २६ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तालुकास्तरावरील प्रक्रियेबाबत अजून बदल करण्यात आला नाही. मात्र जिल्हा परिषद मुख्यालयातील बदल्यांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
२५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आज, गुरुवार, उद्या, शुक्रवार या दोन्ही दिवशी केवळ २५ टक्के कर्मचारी उपस्थितीचा निर्णय कायम करण्यात आला आहे.